PHOTOS

PHOTO : आईच्या कडेवरील 'ही' चिमुकली मराठी चित्रपटसृष्टीवर करतेय राज्य, PG ते मुंबई आलिशान घर, आज कमावते इतके पैसे

Sai Tamhankar Birthday : ही सांगलीची पोर आज आयफा क्वीन आहे. उत्तम अभिनय जिद्द, चिकाटीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. पीजीमध्ये राहणारी ही अभिनेत्री आज मुंबईत आलिशान घरात राहते. 

Advertisement
1/8

आईच्या कडेवर दिसणारी ही चिमुकली मराठी सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत. ही निरागस मुलगी दुसरी कोणी नसून बोल्ड आणि ब्युटिफूल सई ताम्हणकर आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

2/8

अभिनयासोबत ती आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करत असते. कधी साडीमध्ये तर कधी वेस्ट लूकमध्ये तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते वेडे होतात. 

3/8

तिची अदा, स्टाइल, लूक आणि तितकाच हॉट अंदाजमुळे त्यात बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख तिने निर्माण केलीय. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिला मिळता. 

4/8

पावसाच्या बरसत्या सरींचा आनंद घेण्यासाठी सई कायम निसर्गाच्या सान्निध्यात जात असते. सोशल मीडिया अकाऊंटवर पाऊस आणि ती असे अनेक फोटो पाहिला मिळतात. 

5/8

दुनियादारी, नो एंट्री, धुराळा, वाय झेड, हंटर चित्रपटातून कधी बोल्ड तर कधी सोज्वळ सईचं सौंदर्य आणि अभिनय सर्वांना आवडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार मराठी चित्रपटसृष्टीत बिकिनी घालणारी पहिलीच अभिनेत्री आहे. 

6/8

सांगलीहून मुंबईवर आल्यावर अनेक वर्ष ती पीजीमध्ये राहायची. 2023 मध्ये सईने मुंबईत स्वप्नाचं घर विकत घेतलं. या संघर्षाच्या काळात सईने 10 घरं बदलली आहेत. 

7/8

सईने 2013 मध्ये अमेय गोसावीसोबत लग्न केलं होतं. हे लव्ह मॅरेज काहीच वर्ष टिकलं. अवघ्या दोन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. सध्या ती निर्माता अनिश जोगला डेट करत आहे.

8/8

सईची नेटवर्थ सध्या एक-दोन कोटीच्या घरात आहे. मुंबईत आलिशान घर आणि महागडी गाडी आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास 20-25 लाख रुपये मानधान घेते. 





Read More