PHOTOS

Birthday Special: घटस्फोटित अन् 9 वर्षांनी मोठी आहे 'या' भारतीय क्रिकेपटूची पत्नी; अशी आहे त्यांची Love Story

Venkatesh Prasad Birthday : भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचा आज 56वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. 

 

Advertisement
1/8

आज, 5 ऑगस्ट रोजी भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहे. जवागल श्रीनाथसोबत भारतीय गोलंदाजीला नवे आयाम देणाऱ्या प्रसाद यांच्या खाजगी आयुष्याबाबत फार थोड्यांना माहिती आहे.

 

2/8

आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत.  भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांची प्रेमकहाणी एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही.

 

3/8

वेंकटेशचा स्वभाव खूपच शांत आणि लाजरा-बुजरा होता, पण त्यांच्या प्रेमकथेचा शेवट पूर्णपणे फिल्मी स्टाईलमध्ये झाला. विशेष म्हणजे प्रपोज त्यांनी नव्हे, तर त्यांच्या पत्नीने केलं होतं आणि त्या त्याच्यापेक्षा तब्बल 9 वर्षांनी मोठ्या आहेत. 

 

4/8

वेंकटेश प्रसाद यांचा जन्म 1969 मध्ये झाला, तर त्यांची पत्नी जयंती यांचा जन्म 1960 मध्ये झाला आहे. त्यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर असूनही त्यांनी 1996 मध्ये लग्न केलं. सुरुवातीला वेंकटेशच्या कुटुंबाला ही जोडी मान्य नव्हती, पण नंतर ते तयार झाले. 22 एप्रिल 1996 रोजी या दोघांनी विवाह केला.

 

5/8

काही रिपोर्ट्सनुसार, जयंती या पूर्वी एकदा घटस्फोटित झाल्या होत्या. आज त्यांना ‘पृथ्वी’ नावाचा एक मुलगा आहे.

 

6/8

वेंकटेश आणि जयंतीची ओळख झाली होती भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या माध्यमातून. त्याकाळी कुंबळे टायटन कंपनीत काम करत होते  आणि जयंती तिथे PRO (पब्लिक रिलेशन ऑफिसर) होती. हा काळ 1994 सालचा होता, जेव्हा हे दोघंही मोठे क्रिकेट स्टार्स नव्हते.

 

7/8

पहिल्या भेटीनंतर जयंतीनेच वेंकटेशला प्रपोज केलं, पण त्याने सुरुवातीला नकार दिला. स्टार क्रिकेटर नसल्याने प्रसाद या नात्यापासून दूर राहू पाहत होता. पण जयंतीने हार मानली नाही ती सतत कॉल आणि मेसेज करत राहिली. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली आणि प्रसादने लग्नाचा निर्णय घेतला.

 

8/8

मे 2005 मध्ये वेंकटेश प्रसादने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी आयपीएलमध्ये RCB चा बॉलिंग कोच म्हणून भूमिका पार पाडली. 2007 वर्ल्ड कपनंतर भारताच्या अपयशानंतर त्यांची बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडिया बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली. मात्र ऑक्टोबर 2009 मध्ये कोणतीही स्पष्ट कारणं न देता बीसीसीआयने त्यांना हटवलं. वेंकटेश प्रसादने 33 टेस्टमध्ये 96 विकेट आणि 161 वनडेमध्ये 196 विकेट घेतल्या आहेत.(All Photos: Venkatesh Prasad/Instagram)





Read More