PHOTOS

अभिनेत्रीच्या प्रेमात करिअर लावलं पणाला; सुपरस्टारशी पंगा घेत ठरला FLOP अभिनेता, आज आहे 119 कोटींचा मालक

Entertainment : हा अभिनेता त्याचा चित्रपटापेक्षा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत राहिला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीशी प्रेम आणि त्यानंतर या प्रेमासाठी त्याने करिअरही पणाला लावलं. 

Advertisement
1/7

आम्ही बोलत आहोत, अभिनेता सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आणि अभिनेता विवेक ओबेरॉयबद्दल. 2002 मध्ये कंपनी चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर साथिया या चित्रपटाने त्याला चांगली ओळख दिली. अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तो एकही हिट चित्रपट तो देऊ शकला नाही. आज त्याचा 48 वा वाढदिवस आहे. 

2/7

गेल्या 10 वर्षांपासून विवेक बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. विवेकचं सुरुवातीचं शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूल, हैदराबादमधून झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मेयो अजमेर येथे गेला. अभिनयातील बारकावे शिकण्यासाठी अभिनेता न्यूयॉर्कलाही शिक्षण घेतलंय.  अभिनेता नेहमीच त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अधिक चर्चेत असतो.

3/7

करिअरच्या सुरुवातीच्या काळात विवेकचे ऐश्वर्या राय बच्चनवर प्रेम होतं असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमान खानचे नातेही कोणापासून लपलेलं नव्हतं. असं म्हटलं जातं की, सलमान खान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढू लागली. मात्र, सलमान खानला हे अजिबात आवडलं नव्हतं. 

4/7

या सगळ्या प्रकरणात विवेक ओबेरॉयचं करिअर बरबाद केल्याचा आरोपही सलमान खानवर झाला होता. ऐश्वर्यासोबतची त्याची वाढती जवळीक पाहून सलमानने त्यावेळी विवेकला फोन करून ऐश्वर्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, असं म्हटलं जातं. 

5/7

त्यावेळी विवेकने रागाच्या भरात पत्रकार परिषद घेतली आणि सलमान आणि त्याचे मत जगजाहीर केलं. यानंतर विवेकच्या या हालचालीचा उलटा परिणाम झाला आणि इंडस्ट्रीतील लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली सुरु केली. 

6/7

चित्रपट मिळत नसल्याने विवेकने व्यवसायात हात आजमावला. त्याने ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आणि बांधकाम कंपनीही उघडली. 

7/7

विवेक ओबेरॉयच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची मालमत्ता 119 कोटींच्या घरात आहे. अभिनेता असण्यासोबतच तो एक व्यावसायिक आणि चित्रपट निर्माता देखील आहे. ज्यातून त्याची चांगली कमाई होते. अभिनेत्याकडे अनेक आलिशान बंगले आणि आलिशान कारदेखील आहेत. 





Read More