Mother's Day With Mother In Law : बदलेल्या काळात आज सासू सुनेचं नातंही बदलंय.लग्नानंतर जन्मदाता आईची माया आता सासूकडून लेकींना मिळतंय. तुमचं हे नातं अजून घट्ट करण्यासाठी मदर्स डेला खास मराठीतून द्या प्रेमळ शुभेच्छा
जेव्हा जेव्हा मला माझ्या आईच्या घरातील प्रेम आणि आपुलकी आठवते, तुला तुझ्या सासूच्या कुशीत आईचे प्रेम मिळेल. मदर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
लग्नानंतर प्रत्येक मुलीसाठी सासूच असते आई माहेरात आई जे बीज रोवते तेच पुढे सासू सासरमध्ये वाढवते मातृदिनाच्या शुभेच्छा!
संसार करण्याची शिकवण मिळते सासूकडून सुनेसाठी असते जन्मभराची ही शिकवण मदर्स डेच्या शुभेच्छा
पहिले पाऊल घरात टाकल्यापासून तुमचा आहे डोक्यावर हात सासू म्हणून नाही तर आई म्हणूनच ठेवला मायेचा हात मदर्स डेच्या शुभेच्छा
माहेरीदेखील आई आणि सासरीदेखील आई सून म्हणून कधीच जाणवू दिलं नाही माझ्या प्रेमळ सासूबाईंना मातृदिनाच्या शुभेच्छा
सासूशिवाय घर वाटे उदास घरातील सर्वांसाठी आहे ती खास अशा माझ्या आईरुपी सासूला मदर्स डेच्या शुभेच्छा
आईच्या पदराखालून आले सासूच्या पदराखाली दोघांच्या मायेत काही अंतर नाही आज मातृदिनानिमित्त तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव
मदर्स डेच्या शुभेच्छा देताना सासूच्या घ्या गळाभेट, तेव्हाच सुरू होतील सासू-सुनेच्या प्रेमाने नवे सिलसिले...