Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: गुरुवारी रात्री हार्दिक पंड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाची होती.
हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर पोस्ट करत नताशासोबत घटस्फोट घेण्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यातील घटस्फोटाची चर्चा रंगली होती.
अशातच आता हार्दिक पांड्याने इन्टाग्राम पोस्ट करत घटस्फोट घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान हार्दिक आणि नताशाला 4 वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव अगस्त्या आहे. त्यामुळे आता अगस्त्याचा ताबा कोणाकडे असणार हे महत्त्वाचं आहे.
मात्र याबाबतही हार्दिकने पोस्टमध्ये नमूद केलंय. हार्दिकने म्हटलंय की, अगस्त्या आमचा मुलगा असून तो आमच्या दोघांच्याही आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहणार आहे.
अगस्त्याच्या आनंदासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. आम्ही दोघंही त्याचे को-पेरेंट राहू, असं हार्दिकने म्हटलं आहे.
4 वर्षांच्या अगस्त्याचे संगोपन को-पेरेंटिंगने होणार आहे. सध्या त्याचा मुलगा नताशासोबत सर्बियामध्ये आहे. त्यामुळे मुलगा आईसोबत राहण्याची शक्यता आहे. पण प्रेम, मुलाचे आयुष्य आणि प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींबाबत ते एकत्र निर्णय घेणार आहेत.