Hardik Pandya On Natasha Stankovic Post : गेल्या 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविक पासून घटस्फोट जाहीर केला होता.
नताशा स्टॅनकोविक मायदेशी रवाना झाल्यानंतर हार्दिकने पोस्ट करत याचा खुलासा केला होता. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेतल्याचं हार्दिकने म्हटलं होतं.
नताशासोबत मुलगा अगस्त्य देखील सर्बियाला गेला आहे. अशातच तिने इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत.
नताशा यामध्ये मुलगा अगस्त्यसोबत दिसत आहे. अगस्तय यामध्ये प्राणीसंग्रहालयात आईसोबत मजा मस्ती करताना दिसतोय.
मुलाला आणि नताशाला आनंदी पाहिल्यानंतर हार्दिक पांड्या देखील खुश झालाय. हार्दिकने नताशाच्या पोस्टवर कमेंट केलीये.
दरम्यान, हार्दिक पांड्याने नताशाच्या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट केली आहे. शेवटी बापाचं काळीज, अशी कमेंट नेटकरी करताना दिसतायेत.