क्रिकेटर आणि बॉलिवूड हे रिलेशन काही नवीन नाही. या दोन्ही क्षेत्रातील सेलिब्रिटींमध्ये अनेकदा जवळीक निर्माण झाली आहे. आता क्रिकेटर हार्दिक पांड्या देखील काही बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत दिसल्याने त्याचे नावदेखील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले जात आहे. याबाबत इंस्टाग्राम पोस्टमधूनही खुलासा झाला आहे. (hardik pandya/Instagram)
क्रुणाल पांड्याच्या लग्नामध्ये अभिनेत्री एली अवराम आणि हार्दिक पांड्या यांचे एकत्र फोटो पाहण्यात आले. त्यामुळे या दोघांमधील रिलेशनशिपबाबतही चर्चा होती.दक्षिण आफ्रिका दौर्यादरम्यान एली अवराम हार्दिक पांड्यासोबत एअरपोर्टवर एकत्र दिसली.
एली पाठोपाठ काही दिवसांंमध्ये हार्दिकचं नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडण्यात आले. काही पार्टींमध्ये ते एकत्र दिसले. मात्र या पार्टीनंतर उर्वशीने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. त्यामध्ये हार्दीक पांड्याचा उल्लेख 'भाऊ' असं करत अफवांंना पूर्णविराम दिला आहे. (urvashirautela/Instagram)
एली, उर्वशीनंतर आता हार्दिक पांड्यांचं नाव अभिनेत्री ईशा गुप्तासोबत जोडण्यात आले आहे.
हार्दिक आणि ईशाची ओळख एका पार्टीमध्ये झाली. त्यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढली. ईशा आणि हार्दिकने त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. ईशाने शेअर केलेल्या काही फोटोंंमधून त्यांच्यामधील संबंधांंबाबतचे संकेत मिळाले आहेत. (hardikpandya/egupta/Instagram)
ईशा गुप्ताच्या पोस्टवरून हार्दीक आणि तिच्यामधील रिलेशनशीप या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतेच ईशाने फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये हे फोटो माझा लवर (प्रियकर) राहूलने क्लिक केल्याचे तिने स्पष्ट केले आहे.(egupta/Instagram)
राहुल एक फॅशन आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर आहे. अनेक अभिनेत्रींचे फोटोशूट केले आहे. राहुलने इंस्टाग्रामवर ईशाचेही फोटो शेअर केले आहेत. egupta/Instagram)