Hardik Pandya House: सध्या आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला अद्याप सूर सापडलेला नाही. मुंबईला तिन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडण्यात आले. अशातच हार्दिक पांड्याचे अलिशान घराचे फोटो व्हायरल होत आहे.
आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सलग तिसऱ्या पराभवामुळे सोशल मीडियावर हार्दिक पांड्या ट्रोल होत आहे. तर दुसरीकडे त्याचे गुजरातमधील वडोद्यातील 6 हजार चौरस फुटांचे घराचे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो तुम्ही पाहिलेत का?
हार्दिक हा अतिशय स्टायलिश क्रिकेटर आहे. हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांनी अल्पावधीतच मोठी कीर्ती आणि नशीब मिळवले. या दोघांनी मिळून गुजरातमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. या घरामध्ये इतर सर्व प्रकारच्या सुविधा आहेत.
हार्दिकने घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हार्दिक पांड्याच्या बेडरूमची रचना ब्लू थीमवर करण्यात आली आहे. याशिवाय हार्दिकच्या घरात गेमिंग झोन आणि स्विमिंग पूलही आहे.
हार्दिक पांड्याची बेडरूम अतिशय आकर्षक असून त्यात उत्तम सुविधा आहेत. बेडरूममध्ये त्याचे काही आवडते फोटो आहेत.
हार्दिक पांड्याच्या पेंटहाऊसमध्ये एक मोठी गेस्ट रूम आहे. आरामदायक सोफे आणि एक मोठा टीव्ही स्क्रीन आहे. हार्दिकने त्याच्या घरात एक अल्ट्रा-मॉडर्न लिव्हिंग रूम बनवली आहे, जिथे तो आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो.
हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पांड्या या दोघा बंधूंना देखील सिनेमाचं खूप वेड आहे, चित्रपटाच्या वेडापायी त्यांच्या घराच एक छोटासा थिटर घेतला आहे. ज्यामध्ये बसून सिनेमाचा आनंद घेतात.
हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करतो. टूर वर असताना तो अनेक जिम व्यायाम करताना नजरेस पहा. त्याची काही वेळ जीममध्ये घालवतो. यासाठी त्याने घरच एक छोटी जीम तयार केली आहे.