Entertainment News : राहुलची चर्चा होण्यामागं त्याचा कोणता आगामी चित्रपट नव्हे, तर त्याची बहीण कारणीभूत ठरत आहे.
Entertainment News : पिया ग्रेस रॉय असं राहुलच्या बहिणीचं नाव. प्रियांका या नावानंही ती ओळखली जाते. बरं, काहींसाठी तिची आणखी एक ओळख, ती म्हणजे हरी माँ. कधीकाळी सुपरमॉडेल असणारी प्रियांका आता संन्यस्त आयुष्य जगत असून, ती या झगमगाटापासून कैक मैल दूर गेली आहे.
प्रियांका जेव्हा कलाजगतामध्ये सक्रिय होती तेव्हा तिला पिया ग्रेस रॉय या नावानं प्रसिद्धी मइळाली होती. आता मात्र हरी माँ हीच तिची ओळख आहे. अध्यात्माच्या मार्गाची निवड करत तिनं एका वेगळ्या जीवनशैलीला आत्मसात केलं आहे.
युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रियांका तिच्या राहणीमान आणि जीवनशैलीविषयीची माहिती देते. ती एक फिलोसॉफर आणि कमर्शियल वॉलेंटियर म्हणून काम करते. हल्लीच प्रियांका आणि तिचा भाऊ, राहुल रॉय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवासाठी हजेरी लावली होती.
प्रियांकानं 2020 मध्ये रोमीर सेनशी लग्न केलं होतं. लग्नाआधी तिनं एका पोस्टच्या माध्यमातून या नात्याची माहिती सर्वांना दिली. इथं तिनं जन्मोजन्मीचं नातं, दोन आत्म्यांमधील उर्जा अशा अनेक संज्ञा कॅप्शनमध्ये वापरल्या होत्या.
प्रियांका आणि तिचा पती सोशल मीडियावर सक्रिय असून, बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असता. ते दोघं आपल्या नात्यतून अनेकांना शिकवणही देतात.
सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेता राहुल रॉय आणि प्रियांका सख्खे भाऊ बहीण नसून, राहुलच्या पालकांनी तिला दत्तक घेतलं होतं. असं असलं तरीही त्यांचं नातं मात्र सख्ख्या भावाबहिणीहूनही अधिक दृढ आहे.
सणवार असो किंवा एखादा खास प्रसंग, प्रियांका आणि राहुल कायमच एकत्र पाहायला मिळतात. या सेलिब्रिटी भाऊ- बहिणीचे रक्षाबंधनचे फोटोही बरेच चर्चेत आले होते. राहुलला ब्रेन स्ट्रोक आला, त्यावेळीही प्रियांकानं त्याची बरीच काळजी घेतली होती.