बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींची ओळख फक्त त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांशी असलेल्या नात्यांसाठीही होते. विशेषतः सास...
bollywood's famous saas: बॉलिवूडमधील या सासू-सून जोड्या हे दाखवून देतात की प्रेम, आदर आणि संवाद असेल तर कोणतेही नाते सुंदर आणि दीर्घकाळ टिकणारे ठरू शकते. सासू आणि सून यांच्यातील नातं मैत्रीने भरलेलं असेल, तर संपूर्ण घराचं वातावरण सकारात्मक आणि प्रेमळ राहतं. या अभिनेत्री केवळ ऑन-स्क्रीनच नव्हे, तर ऑफ-स्क्रीनही प्रेरणा देणाऱ्या आहेत.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर वीणा कौशलसोबतचे नाते फार गोड झाले आहे. कतरिनाने सासूबाईंसोबत अनेक सण साजरे केले आहेत आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या प्रेमळ नात्याची झलक दाखवली आहे.
शर्मिला टागोर या स्वतः एक मोठ्या अभिनेत्री होत्या. करीना कपूर खान त्यांचा फार मान राखते. दोघीही एकमेकींसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतात. त्यांचे नाते आदराचे नाही तर मैत्रीचेही आहे.
दीपिका आणि रणवीर सिंगच्या आई अंजू भवनानी यांच्यातील नाते फारसे प्रसिद्ध नाही, पण जेव्हा जेव्हा त्या एकत्र दिसतात, तेव्हा त्यांच्यातील आपुलकी जाणवते. दीपिका या नात्याला आई-मुलीच्या नजरेने पाहते.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या आई डेनिस मिलर यांच्यातील नाते खूप जवळचे आहे. डेनिस ह्या फक्त सासूबाई नसून प्रियंकाच्या अमेरिकेतील कुटुंबाची मुख्य स्तंभ आहेत. त्या दोघी अनेक वेळा एकत्र वेळ घालवताना दिसतात.
काजोलने अजय देवगणच्या आईला तिच्या स्वतःच्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे. दोघींचे अनेक कौटुंबिक कार्यक्रमातले फोटो पाहिले की त्यांच्या मधील गोडवा स्पष्ट जाणवतो.
या नात्याबद्दल विविध चर्चा होतात, कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक. पण ऐश्वर्या आणि जया यांच्यात परस्पर आदर आहे. कोणत्याही नात्यात थोडेफार मतभेद असू शकतात, पण त्यातून नातं अधिक मजबूत होतं.
आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांचे नाते अगदी मैत्रीचे आहे. नीतू कपूर अनेकदा आलियाचे कौतुक करताना दिसतात. तर आलियाही तिच्या सासूला 'एक खास मैत्रीण' मानते.