MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा
यंदाच्या हंगामात तो खूप चांगली फलंदाजी करतोय. मला आशा आहे की, धोनी चेन्नईसाठी खेळत राहील, असं मायकल हसीने म्हटलं आहे.
चेन्नईच्या शिबिरात लवकर आला आणि त्याने भरपूर सराव केला आणि संपूर्ण हंगामात तो फॉर्मात आहे, असं मायकल हसी म्हणाला.
गेल्या मोसमानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा मैदानात पाय ठेवले अन् चांगली कामगिरी केलीये, असं म्हणत हसीने थालाचं कौतूक केलंय.
महेंद्रसिंग धोनीने टूर्नामेंटपूर्वी कर्णधारांच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं होतं. ऋतुराज कॅप्टन असेल, असं धोनीने सांगितलं अन् आम्हाला धक्का बसला.
एवढ्या लवकर कोणताही निर्णय येईल असं वाटत नाही. पण त्याने घेतलेला निर्णय हा त्यालाच माहित असतो, इतर कोणालाही याची माहिती नसते, असंही हसीने म्हटलंय.
धोनीला थोडा ड्रामा क्रिएट करण्याची सवय आहे. पण त्याच्या निर्णयावर कोणीही काही बोलू शकत नाही. पण चाहत्यांना तो अधिक खेळावा, अशीच अपेक्षा असते, असंही हसीने म्हटलं आहे.
दरम्यान, चाहत्यांची इच्छा आहे की त्याने वरच्या क्रमांकावर खेळायला यावं, पण गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तसं व्यवस्थापन संघाला करावं लागेल, असंही हसीने यावेळी म्हटलं आहे.