PHOTOS

प्रमाणात बीयर प्याल तर होतील हे '6' आरोग्यदायी फायदे !

Advertisement
1/7
calorie count and beer
calorie count and beer

 अनेकांना बीयरचं सेवन करणं हे नशेचा किंवा मादक पेयांच्या सेवनाचा एक भाग वाटतो. मात्र प्रमाणात बीअरचं सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. म्हणूनचं कॅलरीच गणित सांभाळून बिअर  पिणे या कारणांसाठी फायदेशीर ठरते.    लाईट बिअरचा एक कॅन – 102.7 cal (1 can = 350ml) रेग्युलर बिअरचा एक कॅन – 153.1 cal ((1 can = 350ml) बाटलीभर फ्रुट बिअर – 130 cal (1 bottle = 550 ml) बाटलीभर Sapporo बिअर – 257 cal ((1 bottle = 550 ml)

2/7
health benefits of drinking beer and bones
health benefits of drinking beer and bones

 बीयरच्या सेवनामुळे शरीरात हाडांची डेन्सिटी सुधारण्यास मदत होते. बिअरमध्ये सिलिकॉनचं प्रमाण मुबलक प्रमाणात असते. तुफ्त युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, क्वचित बीअरचं सेवन करण्याच्या तुलनेत नियमित पण प्रमाणात बीअरचं सेवन करण्यांमध्ये हाडांचे,सांध्यांचे दुखणे कमी असते. काही संशोधनानुसार, आठवड्यातून तीनदा आणि प्रमाणात बिअर प्यायल्यास अर्थ्राईटीसचा त्रास कमी करण्यास मदत होते.

3/7
health benefits of drinking beer for hearts
health benefits of drinking beer for hearts

एका संशोधनानुसार, नियमित सुमारे 473 मिली (1 pint) बिअर प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारते. हृद्याच्या रक्त वाहिन्या अधिक लवचिक बनतात. बिअर प्यायल्यानंतर सुमारे तासाभरातच रक्तपुरवठा सुधारायला मदत होते

4/7
health benefits of drinking beer for Kidney
health benefits of drinking beer for  Kidney

किडनीचं आरोग्य सुधारते - बीअरमध्ये 93% पाणी असते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक मूत्रा मार्गे बाहेर टाकण्यासाठी मदत होते. यामुळे किडनीचं कार्य सुधारते. मात्र बीअरचं सेवन प्रमाणात करणं आवश्यक आहे. अनेकजण बीअरच्या सेवनामुळे मूतखड्याचा त्रास कमी झाल्याचेही सांंगतात. 

5/7
health benefits of drinking beer for Cancer
health benefits of drinking beer for Cancer

शिजवलेल्या मांसामधील कॅन्सरला चालना देणारे घटक कमी करण्याची क्षमता बिअरमध्ये असते. त्यामुळे प्रमाणात केलेले बिअरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.बीअरमध्ये पॉलीफेनोल घटक मुबलक असल्याने प्रोस्टेट कॅन्सरप्रमाणे अन्य कॅन्सरचा धोका  कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

6/7
health benefits of drinking beer for hair
health benefits of drinking beer for  hair

 केसांसाठी फायदेशीर  - बीअर शाम्पू केसांचे आरोग्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरते. बीयरमध्ये व्हिटॅमिन बी आणि यिस्टचे प्रमाण मुबलक असल्याने बीअरचा वापर केल्याने केसातील कोंड्याची समस्या कमी होते.   नियमित आठवड्यातून 2-3 दिवस बिअरने केस  धुणे फायदेशीर ठरते. 

7/7
health benefits of drinking beer for brain health
health benefits of drinking beer for brain health

अल्जाइमरचा धोका कमी होतो -  बीअर प्रमाणात प्यायल्यास अल्जाइमर  आणि  डिमेंशिया चा धोका कमी होतो. 11 हजार वृद्ध महिलांवर केलेल्या एका संशोधनातून हा निष्कर्ष पुढे आला आहे





Read More