10 Types Of Food to Avoid In Summer: ज्याप्रमाणं प्रत्येत ऋतूच्या अनुषंगानं पोषक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो, त्याचप्रमाणं काही गोष्टींचं सेवन टाळल्यामुळंही शरीरास याचा फायदा होतो.
तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळं उन्हाळ्यात अपचनाची समस्या भेडसावू शकते. त्यामुळं हे पदार्थ टाळणं योग्य.
सहसा आदल्या दिवशीचा उरलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी खाण्यात काही गैर नाही असं अनेकजण म्हणतता. पण, उन्हाळ्यात ही सवय दूर ठेवा.
हल्ली देशोदेशीचे पदार्थही स्थानिक खाऊगल्ल्यांमध्ये मिळू लागले आहेत. पण, उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी हे बाहेरचं खाणं टाळा.
चहा आणि कॉफी यांसारख्या पेयांमुळं शरीरातील पाण्याची पातळी खालावते. त्यामुळं उन्हाळ्यात ही पेयं टाळा.
सोडियमचं अधिक प्रमाण असणारं लोणचंही शरीरातील पाण्याची पातळी कमी करतं. शिवाय यामुळं अपचनाचा त्रासही उदभवतो.
शीतपेय किंवा सोडा उन्हाळ्यात सर्रास प्यायला जातो. पण, यामध्ये असणारं साखरेचं अती प्रमाण शरीरासाठी धोक्याची सूचना असतं.
उन्हाळ्यात थंडगारस मिल्कशेक पिण्यास अनेकांची पसंती असली तरीही तो शरीराराठी फायदेशीर नाही. यामुळं एका क्षणात शरीरात कॅलरीज वाढतात. परिणामी उच्च रक्तदाबासारख्या समस्याही भेडसावू लागतात.
भाजलेलं मांस, चिकन असे पदार्थही उन्हाळ्यात खाणं टाळावं. अशा पदार्थांमुळं पचनसंस्था बिघडते.
मद्यपान करण्यापासून उन्हाळ्यात दूरच राहिलेलं बरं. मद्याच्या सेवनामुळं शरीरातील पाणी घाम आणि इतर माध्यमांतून बाहेर पडून पाण्याची पातळी खालावते.