PHOTOS

बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम

Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Advertisement
1/7
सकाळी रिकाम्या खा
सकाळी रिकाम्या खा

बदामात फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॉपर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फॉस्फरस सारखे घटक असतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. 

2/7
त्वचा चमकदार होते
त्वचा चमकदार होते

काजू, बदाम, बेदाणे खाल्ल्याने त्वचेची चमक वाढते. पिंपल्सपासून बचाव होतो आणि सुरकुत्या लवकर येत नाहीत.

3/7
मन निरोगी राहतं
मन निरोगी राहतं

काजू, बदाम, बेदाणे एकत्र खाल्ल्याने मनाला थंडावा मिळतो. यासोबतच मेंदूही तीक्ष्ण होतो. 

4/7
पचनसंस्था सुधारते
पचनसंस्था सुधारते

काजू, बदाम, मनुका यांचं सेवन केल्याने पचनक्रियाही मजबूत होते. सुक्या मेव्यामध्ये भरपूर फायबर असल्याने पचनक्रिया खूप मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. 

 

5/7
वजन संतुलित राहतं
वजन संतुलित राहतं

ड्रायफ्रुट्समध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे उपाशी पोटी सकाळी उठल्यावर नियमित तुम्ही ड्रायफ्रुट्स खाले तर वजन संतुलित ठेवू शकतो. 

6/7
खराब कोलेस्टेरॉल कमी करतो
खराब कोलेस्टेरॉल कमी करतो

शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काजू, बदाम, मनुका यांचं रोज सेवन करा.

7/7
दात आणि हाडे मजबूत
दात आणि हाडे मजबूत

काजू, मनुका आणि बदाम हे देखील दात मजबूत करण्यासाठी चांगले आहेत. काजूमध्ये असलेले कॅल्शियम दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. तसंच हाडे मजबूत होतात.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Read More