Side Effects of Eating Too Much Red Chilli: जेवणात लाल मिरचीचा वापर केल्यानं आपल्या शरीराला अनेक पोषकतत्वं मिळतात, पण तुम्हाला माहित आहे का की जास्त प्रमाणात तिखट खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
लाल मिरचीला अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजांचा समृद्ध स्रोत मानलं जातं, पण त्याचं सेवन योग्य प्रमाणात होणं गरजेचं आहे. विशेषत: लाल मिरचीपासून तयार केलेली पावडर म्हणजे तिखट हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊया जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्यानं आपल्या शरीराला कोणते त्रास होऊ शकतात.
हे आहेत जास्त तिखट खाण्याचे 8 तोटे
लाल मिरचीमध्ये कॅप्साइसिन नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे पोटात जळजळ होते आणि आतड्यांनाही त्रास होते. याशिवाय अपचन, गॅस आणि पोटदुखी या सारख्या समस्या उद्भवू शकतात.
लाल मिरचीचं सेवन केल्यानं तोंड, डोळे आणि शरीराच्या अंतर्गत भागात जळजळ होऊ शकते. डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
जास्त प्रमाणात तिखट खाल्याने पोटात अल्सर होण्याचा धोका वाढतो कारण लाल मिरची पावडर आपल्या आतड्यांना चिकटून राहते.
तिखट जास्त प्रमाणात खाल्ल्यानं खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
लाल मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यानं आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन तणाव वाढू शकतो.
लाल मिरची निसर्गतः उष्ण असते. त्यामुळे अनेकदा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
तिखटाच्या जास्त सेवनानं अनेक प्रकारच्या अॅलर्जीचाही त्रास होऊ शकतो.
इतर सगळ्या त्रासांसोबतच लाल मिरचीचं जास्त सेवन केल्यानं घशाची जळजळ वाढून खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)