Sweaty Hairs Home Remedies: उन्हाळ्यात घराबाहेर पडणे म्हणजे त्रासदायक असते. घाम आणि चिकचिक यामुळं चिडचिड होतेय. उन्हाळ्यात केसांमध्येदेखील घाम येतो. त्यामुळं केस चिकट होतात आणि केसांत कोंडा होण्याचे वाढते. अशावेळी काय करायचे हे जाणून घेऊयात.
उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेबरोबरच केसांचीही काळजी घेण्याची गरज असते. केसांची व स्कॅल्पची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची काळजी कशी घ्यायची पाहुयात.
केसांत घाम आल्यानंतर तो तिथेच मुरतो. अशावेळी घाम तसाच राहिल्याने केस चिकट होतात. त्यामुळं केसांत खाज येते. उन्हाळ्याच्या दिवसांत केस आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुवावेत
उन्हाळ्यात केस मोकळे ठेवू नये त्यामुळं घाम जास्त येतो. अशावेळी केस शक्यतो बांधून ठेवा. केसांना वरच्या वाजूला क्लिप लावून ठेवा. रबर लावणे टाळावे यामुळं केस तुटण्याची भिती असते.
केस घामाने ओले झाले असतील तर सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरने सुकवले जातात. मात्र तसे करू नका. ब्लो ड्रायरमुळं केस तुटू शकतात तसंच, केस जास्त कोरडे होतात. ब्लो ड्राय करण्यापेक्षा टॉवेलने पुसावेत
केस खराब होऊ नये म्हणून स्कार्फ किंवा टोपीचा वापर करावा. स्कार्फ शक्यतो सुती कापडाचा आणि फिक्या रंगाचा असावा
केसांना चमक आणण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी चहाच्या पानांचे पाणी देखील खूप प्रभावी आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंटमुळं केसांमधील वास निघून जातो.
उन्हाळ्यात काकडी, कलिंगड यासारखी फळे आहारात घ्यावी. यामुळं उन्हाळे लागण्याचे प्रमाण कमी होते.