आजकाल धावपळीच्या जीवनात बद्धकोष्ठता ही सामान्य समस्या बनली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चुकीचे खाणे-पिणे, कमी पाणी पिणे आणि जेवणात फायबरची कमतरता हे मुख्य कारण असू शकतात.
बद्धकोष्ठता झाल्यास शौचास त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं पोट साफ होत नाही. अशावेळी पोटात वेदना होणे, त्याचबरोबर चिडचिड होते. तसंच, व्यक्ती थकलेला व कमजोर होतो. लाइफस्टाईल आणि डाएटमध्ये बदल करुन यावर मात करु शकता.
बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी आहारात फायबरची मात्रा वाढवा. राजमा, चण्याची डाळ, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, अळशी यासरख्या बिया आणि चिया सिड्स तुमच्या आहारात समावेश करा.
हे पदार्थ पाचनतंत्र मजबूत करते आणि पोट साफ होण्यास मदत करते. त्यामुळं बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसंच, शौचालयात जोर काढावादेखील लागत नाही.
बद्धकोष्ठतेवर लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास आतड्यातील घाण बाहेर टाकण्यास मदत येते. यामुळं शौचास साफ होते.
सुकामेव्याचा वापर आहारात घ्यावा. सुकवलेले अंजीर तुम्ही खावू शकता. त्यामुळं पाचनक्रिया सुरळीत होईल.
इसबगोल हे एका पद्धतीचे फायबर आहे आणि पचनक्रिया करण्याचे काम हे करते. पचनशक्ती वाढवून मलत्याग करणे सुखकर होते.
बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय म्हणजे पाण्याचे प्रमाण वाढवणे. शरीर हायड्रेट राहिल्यास शौचालयात जोर काढावा लागत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)