PHOTOS

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलंय, कसं ओळखाल? रात्री दिसतात 'ही' लक्षणे

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. हृदयविकार हा सध्या भारतात फोफावत जाणारा आजार आहे. त्यामुळं शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू न देणे हे खूप गरजेचे आहे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलंय हे कसं ओळखाल? याचे काही संकेत जाणून घेऊया. 

Advertisement
1/7
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलंय, कसं ओळखाल? रात्री दिसतात 'ही' लक्षणे
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलंय, कसं ओळखाल? रात्री दिसतात 'ही' लक्षणे

हाय कोलेस्ट्रॉलमुळं हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांची समस्या निर्माण होते. अशावेळी वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. खासकरुन रात्रीच्या वेळी बॅड कोलेस्ट्रॉलचे लक्षण दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करु नका. 

2/7
पायांची जळजळ
पायांची जळजळ

रात्रीच्या वेळी पायांची जळजळ होणे हे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याचे मोठे लक्षण असू शकते. 

3/7
छातीत वेदना
छातीत वेदना

तुम्हाला रात्री झोपताना छातीत वेदना होत असतील तर अजिबात दुर्लक्ष करु नका. हेदेखील हाय कोलेस्ट्रॉलचे एक लक्षण असू शकते. 

4/7
मुंग्या येणे
मुंग्या येणे

 हाता-पायांना मुंग्या येणे हे देखील शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याचे एक लक्षण आहे. रात्रीच्या वेळी जर याचे प्रमाण वाढले तर लगेचच डॉक्टरांची भेट घ्या. 

5/7
श्वास घेण्यास त्रास
 श्वास घेण्यास त्रास

रात्रीच्या वेळी झोपताना जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल. किंवा श्वास फुलल्यामुळं झोपमोड झाली तर एकदा हाय कोलेस्ट्रॉलची चाचणी करुन घ्या. 

 

6/7
पाय थंड पडणे
पाय थंड पडणे

रात्रीच्या वेळी पाय एकदम बर्फासारखे थंड पडले असतील तर शरीरात बॅड कोलेस्ट्रोल वाढल्याचा एक लक्षण आहे. 

7/7
Disclaimer
Disclaimer

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 





Read More