PHOTOS

30 दिवस पूर्णपणे मीठ खाणं सोडून देणं चांगलं की वाईट? तज्ज्ञ काय सांगतात

Advertisement
1/7
30 दिवस पूर्णपणे मीठ खाणं सोडून देणं चांगलं की वाईट? तज्ज्ञ काय सांगतात
30 दिवस पूर्णपणे मीठ खाणं सोडून देणं चांगलं की वाईट? तज्ज्ञ काय सांगतात

एक महिना मीठ खाणं सोडल्यास शरीरात काय परिणाम होतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, एका निरोगी व्यक्तीने दिवसातून 4ग्रॅमपेक्षा जास्त मीठाचे सेवन करू नये. पण पूर्णपणे मीठ खाणं बंद केल्यास काय होईल, हे जाणून घेऊया. 

2/7
वजन कमी होते
वजन कमी होते

30 दिवस मीठ खाणं सोडून दिल्यास त्याचा पहिला परिणाम वजनावर होतो. वजन कमी होण्यास सुरुवात होते. 30 दिवसांत मीठ नाही खाल्लं तर कमी खाण्याची सवय होऊन जाते. त्यामुळं पोट आणि कंबरेची चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

3/7
पचनसंस्थेवर परिणाम
पचनसंस्थेवर परिणाम

एक महिन्यासाठी मीठ खाणं सोडल्यास त्याचा शरीरातील अवयवांवर परिणाम होऊ शकतो. यामुळं तुमच्या पचनसंस्थेवर व आतड्यांवर परिणाम होऊ शकते. त्यामुळं पोटदुखी आणि इतर आजारांची शक्यता वाढते

4/7
मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्य

पूर्णपणे मीठ खाणं सोडल्यास ते तुमच्या मानसिक अवस्थेवर परिणाम करणारे ठरू शकते. तुम्हाला तणाव, चिंता आणि नैराश्य ग्रासू शकते. म्हणजेच योग्य प्रमाणात मीठ खाणं खूप गरजेचं आहे. 

5/7

 संपूर्ण एक महिन्यासाठी मीठ खाणं बंद केलं तर ते शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळं मीठ खाणं पूर्णपणे बंद करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

6/7

मीठात सोडियम असते जे आपल्या शरीरासाठी थोड का होईना पण गरजेचे असते. त्यात पोषकतत्व असतात आणि त्याची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. फक्त प्रमाणात मीठाचे सेवन करायला हवे. 

 

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)





Read More