PHOTOS

वेळीच सावध व्हा! शरीरात 'हे' बदल दिसले तर समजून घ्या गंभीर आजारांचे....

Health Tips : अनेक वेळा आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा जुनाट आजार होतात. अशावेळी वेळीच सावध झाल्याचे अधिक चांगले आहे.

Advertisement
1/6
भूक किंवा तहान लागल्यावर
भूक किंवा तहान लागल्यावर

भूक किंवा तहान लागल्यावर शरीर आपल्याला काही संकेत देत असतात. त्याचप्रमाणे शरीरात कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यानंतर समस्या निर्माण होऊ लागतात.

 

2/6
शरीराचे तापमान
शरीराचे तापमान

जसे की हातपाय दुखणे, शरीराचे तापमान अचानक वाढणे किंवा थकल्यासारखे वाटणे, हे एक किंवा दुसरे संकेत तुम्हाला देत आहेत. पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे, तुमचे शरीर सुरळीत काम करू शकत नाही किंवा काही प्रकारच्या आरोग्याच्या स्थितीमुळे तुमचे शरीर काही ना काही संकेत देऊ शकते. त्यामुळे ही चिन्हे नीट ओळखणे आवश्यक आहे.

3/6
दातांच्या हिरड्यांमधून रक्त येणे
दातांच्या हिरड्यांमधून रक्त येणे

दातांच्या हिरड्यांमधून रक्त येणं म्हणजे व्हिटॅमिन सीची कमतरता असणे. हार्मोनल असंतुलन, यकृताशी संबंधित आजार आणि रक्ताचे विकारही होऊ शकतात. जर तुम्हाला हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यापासून दूर राहण्यासाठी सायट्रिक भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

4/6
बर्फ खाण्याची क्रेविंग
बर्फ खाण्याची क्रेविंग

बर्फ खाण्याची इच्छा होण्याचे म्हणजे एक प्रकारचे एनीमिक असते. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्हाला बर्फ खाण्याची इच्छा होते. म्हणूनच तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. 

 

5/6
त्वचा कोरडी होणे
त्वचा कोरडी होणे

बदलत्या ऋतूमुळे कोरड्या त्वचेची समस्या सामान्य आहे. पण जर जास्त कोरड्या त्वचेची समस्या असेल तर समजून घ्या की तुमच्या शरीरात पोषणाची कमतरता आहे. बहुतेक वेळा असे होते की शरीरात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते. तुमच्या आहारात अंडी, पालक, बदाम आणि सूर्यफूल बिया यांसारखे व्हिटॅमिन ईचे चांगले स्रोत असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

6/6
पाय दुखणे
पाय दुखणे

पाय दुखणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु त्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर तुमचे पाय जास्त दुखत असतील तर तुमच्यात मॅग्नेशियम किंवा व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. शरीरात पाण्याची कमतरता किंवा स्नायूंच्या थकव्यामुळे पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते. व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी दूध, दही, मासे, भोपळ्याच्या बिया, हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.

 





Read More