Health Tips Benefits Of Morning Walk Regularly: रोज अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला फार फायदा होतो असं म्हटलं जातं. मात्र एका अभ्यासामध्ये हा दावा खरा असल्याचं पुराव्यांसहीत सिद्ध झालं आहे. रोज केवळ अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. रोज किती किलोमीटर चालल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. रोज चालल्याने आरोग्यासंदर्भातील 5 फायदे जाणून तुम्हीपण नक्कीच उद्यापासूनच चालायला जाल यात शंका नाही. चला तर पाहूयात हे फायदे आहेत तरी कोणते...
रोज किमान अर्धा तास चालल्याने प्रकृती ठणठणीत राहण्याबरोबरच मनही प्रसन्न राहते. रोज चालण्याने कोणकोणते फायदे आहेत पाहूयात...
जेवढं तुम्ही चालणार तितका तुमच्या आरोग्याला फायदा होणार असं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात माहिती समोर आली. सुदृढ राहायचं असेल तर रोज किमान 5000 ते 10000 पावलं चाललं पाहिजे, असं सांगितलं जातं.
रोज 5 ते 10 हजार पावलं चालल्यास हृदयशी संबंधित समस्यांचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. हृदयविकाराशी संबंधित लक्षणं आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोकाही कमी होतो.
रोज एक तास किंवा अर्धा तास चालल्याने शरीरामधील गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. चालण्यासाठी सर्वोत्तम वेळ हा सकाळचा असतो.
सकाळी चालायला गेल्याने शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. चालल्याने हृदयाचं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.
रोज किमान अर्धा तास चालल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. नियमितपणे चालल्यास उच्च रक्तदाबाचा त्रासही कमी होतो.
रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी सकाळी वॉकला जाणं त्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं.
वजन कमी करण्याचा प्रयत्नामध्ये अनेकजण जीममध्ये घाम गाळतात. अशा लोकांनी दिवसभरामध्ये साधारण एक तास चाललं तरी फायदा होईल.
चालल्याने वजन कमी करण्यासही मदत होते. चालताना मोठ्या प्रमाणात कॅलरी खर्च होतात.
साखरेचा त्रास असलेल्यांसाठीही चालायला जाणं फायद्याचं ठरतं. डायबिटीजचा त्रास असलेल्यांनी आवर्जून चालायला गेलं पाहिजे.
डायबिटीज असलेल्या व्यक्तीने रोज किमान 30 मिनिटं चाललं पाहिजे. त्यामुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. तसेच स्नायू मजबूत होतात.
Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.