PHOTOS

Dry Fruits For Body Part: शरीराच्या कोणत्या भागासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर? जाणून घ्या

Dry Fruits Benefits For Body Part: शरीराच्या आरोग्यासाठी ड्रायफ्रूट खूप गरजेचे आहे. शरीराच्या कोणत्या भागासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया.

 

Advertisement
1/7

आपल्या सर्वांना माहित आहे की ड्रायफ्रूट आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही विशिष्ट ड्रायफ्रूट शरीराच्या काही भागांसाठी जास्त फायदेशीर असतात? 

 

2/7

ड्रायफ्रूट हे शरीराच्या प्रत्येक भागावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. शरीराच्या कोणत्या भागासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया.

 

3/7

अक्रोड मेंदूसाठी खूप फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड मेंदूसाठी फायदेशीर आहे. जे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता सुधारण्यासाठी मदत करते. 

 

4/7

बदाम सगळेच खातात, पण आपल्या शरीराच्या कोणत्या भागाला बदाम खूप फायदेशीर ठरतो हे तुम्हाला माहित आहे का? बदाम खाणे तुमच्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.

 

5/7

जर तुम्हाला नेहमी सांधे किंवा हाडांमध्ये दुखत असेल तर तुम्ही आवर्जून अंजीर खावे. अंजीरमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल.

 

6/7

भिजवलेले मनुके खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त निश्चितच वाढते. पण हे ड्रायफ्रूट आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.  हे वयाशी संबंधित डोळ्यांच्या समस्या कमी करण्यास देखील मदत करू शकते.

 

7/7

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More