संध्याकाळी कामाच्या गडबडीनंतर आपल्याला छोट्या भूकेची इच्छा होणं स्वाभाविक आहे. या वेळेस आपण हेल्दी पदार्थ निवडू शकतो. हे पदार्थ चविष्ट असून आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. पाहूयात संध्याकाळसाठी काही सोपे आणि हेल्दी पदार्थ.
मखाना म्हणजेच 'फॉक्स नट्स', जे आरोग्यासाठी चांगले असतात. मखाना चाटमध्ये मखाना भाजून त्यात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, लिंबू, चाट मसाला आणि इतर मसाले घालून एक हलके आणि पौष्टिक चाट तयार करता येते. हा पदार्थ वजन कमी करणारा आणि पचन सुधारणारा आहे.
स्वीट कॉर्न चाट मध्ये उकडलेले स्वीट कॉर्न्स, काकडी, टोमॅटो, हिरवी मिरची आणि चाट मसाला वापरून एक चविष्ट चाट तयार करता येतो. स्वीट कॉर्न फॅट फ्री असून, पोट भरणारे आणि पोषण देणारे असतात.
पनीर टिक्का एक लोकप्रिय पदार्थ आहे. जो प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर असतो. पनीरच्या तुकड्यांना मसाल्यात मॅरिनेट करून तेल किंवा तूपात भाजून घेतल्यास तुम्हाला एक चविष्ट, हलका आणि हेल्दी स्नॅक मिळतो.
फ्रुट चाट म्हणजे ताज्या फळांचे मसालेदार मिश्रण. यात संत्र, सफरचंद, पेरू, अननस आणि इतर फळांचा समावेश करून त्यात काळी मिरी पूड, लिंबाचा रस आणि चाट मसाला घालून चवदार चाट तयार करावा. हा स्नॅक आहारात व्हिटॅमिन्स आणि फायबर्सचा उत्तम स्रोत असतो.
घरचे फ्रेंच फ्राईज हे हेल्दी आणि चवदार असतात. घरचं तेल किंवा ऑलिव्ह तेल वापरून तळलेल्या बटाट्यांच्या तुकड्यांना मीठ आणि चाट मसाला लावून तुम्ही एक हलका आणि चवदार स्नॅक तयार करू शकता. फ्रेंच फ्राईजमध्ये फायबर्स असतात.
कांदा भजी हा एक लोकप्रिय स्नॅक आहे. अनेकांना पावसाळ्यात कांदा भाजीचा आस्वाद घ्यायला खूप आवडतो. कांद्याच्या कापांना बेसन, हिंग आणि मसाले घालून तळले जाते. तुम्ही भजी तळताना ऑलिव्ह तेलाचाही वापर करू शकतात. ज्यामुळे भजी अधिक हलकी आणि हेल्दी होईल. कांद्यामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स असतात, जे पचन सुधारतात.
बटाटा वडा हा महाराष्ट्रातील खास स्नॅक आहे. जो चविष्ट आणि पोटभर आहे. उकडलेल्या बटाट्याची भाजीचे वडे बनवून बेसनात कोट करून तळले जातात. वड्यांना हलक्या तेलात तळल्यास हे अधिक हेल्दी होऊ शकते. बटाटे पोट भरून, ऊर्जा देतात आणि हार्ट हेल्थसाठी फायदेशीर असतात.
सँडविच हा संध्याकाळसाठी सोपा आणि हेल्दी नाश्ता आहे. त्यात तुम्ही काकडी, टोमॅटो, हमस, पनीर किंवा उकडलेल्या अंड्याचा वापर करू शकता. हे तुम्हाला आवश्यक प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि फायबर्स मिळवून देतात. संध्याकाळी हे सँडविच तुम्ही चहासोबत सर्व्ह करु शकतात.