arathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर ...
छातीत दुखत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. छाती जड होणे, जळजळ होणे, छातीचा भाग जड होणे ही हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे असल्याचे सांगितले जाते. जर तुम्हाला मळमळत असेल आणि हृदयाचे ठोके वाढले आहेत असे लक्षात येत असेल तर लगेच मदत घेण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटत असल्यास, तुमच्या आजूबाजूच्या लोकांची मदत घ्या. तुमच्या जवळचे मित्र आणि नातेवाईक यांना कॉल करा. अशा वेळी रुग्णवाहिका बोलवणे योग्य ठरेल.
हृदयविकाराचा झटका आल्यास, तुम्ही Aspirin tablet 300 mg, Clopidogrel 300 mg किंवा Atorvastatin 80 mg घेऊ शकता. असे केल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो आणि रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेला पुनरुज्जीवन करण्यास मदत होते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी हे उपाय केल्यास जीव वाचू शकतो. रक्तदाबाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी हा उपाय टाळावा.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाबरल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकते. अशावेळी जमिनीवर स्वस्थपणे झोपून जावे आणि पायंच्या खाली उशी ठेवावी. असे करत असताना हळूहळू श्वास घ्यावा. अशावेळी हवेशीर म्हणडे खिडकी, पंखा, एसी समोर झोपणे अधिक फायदेशीर ठरू शकते. हा उपाय केल्याने योग्य प्रमाणात ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचते.
तसेच हार्ट अटॅकमध्ये निदान वाचण्याची शक्यता तरी असते. पण कार्डीयाक अरेस्टमुळे 90 टक्के लोकांचा मृत्यूच होतो. अशा परिस्थितीत, कार्डीयाक अरेस्ट आल्यास रुग्णाला झोपवावे आणि कपडे सैल करावेत आणि कार्डीयाक अरेस्ट आल्यावर लगेच CPR द्यावा.
कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय काम करणे थांबवते. त्यामुळे रुग्ण रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाच्या छातीवर जोरात दाब दिल्यास त्याचा जीव वाचू शकतो. कार्डीयाक अरेस्ट आल्यास ताबडतोब सीपीआर दिल्यास रुग्णाच्या जगण्याची शक्यता 20 ते 30 टक्क्यांनी वाढते असे आढळून आले आहे.
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.