PHOTOS

Mumbai Heatwave: मुंबईचा पारा वाढला, नागरिक उकाड्याने हैराण, रात्रीही अंगाची लाहीलाही

Heatwave in Mumbai: मुंबईत सोमवारी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत.

Advertisement
1/6

मुंबईकर उकाड्याने हैरान झाले आहेत. तापमानाची कमाल आणि किमान पातळी सरासरीपेक्षा थेट तीन ते चार अंशांनी वाढली आहे. 

2/6

एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

3/6

उष्णता वाढल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे.तसेच दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर पडू नका.

4/6

मुंबईत तापमानाचा पारा 39 ते 40 पर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्यातून मुंबईकरांची सुटका होणार नाही. तसेच ठाणे, रायगड, पालघर या जिह्यांनाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

5/6

यंदा मात्र मार्चमध्ये उन्हाचे चटके बसू लागल्यापासून सातत्याने मुंबईची वीजमागणी तीन हजार मेगावॅटच्या वरच आहे. सोमवारी दुपारी 2.40 वाजता मागणीने 3532 मेगावॉटचा उच्चांक गाठला. 

6/6

 एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 





Read More