मत मिळवण्याकरीता प्रत्येक उमेदवार नवीन प्रयोग करुन लोकांचे मन जिंकण्याचे काम करीत आहेत. तसेच या शर्यतीत हेमा मालिनी या देखील मागे नाहीत. मथुरा येथील एका गावात जाऊन त्यांनी शेतात काम केले.
हेमा मालिनी यांना शेतात काम करताना पाहून अनेक शेतकऱ्यांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी त्यांनी सर्वांची विचारपूस केली.
हेमा मालिनी यांना शेतात काम करताना पाहून खूप लोकं प्रभावित झाले होते. हेमा यांच्या रुपाला पाहून अनेकजणं थक्क झाले होते. हेमा यांनी पहिल्यांदातच असे काम केले नाही. या आधीही त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत शेतात जाऊन काम केले होते.
याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी यांनी अशाचप्रकारे शेतात काम करताना दिसले होते. मत मिळवण्याकरीत हेमा यांनी असे केले असावे अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे.
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरामधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हेमा मालिनी यांनी गोवर्धन भागात मोठा रोड शो केला.
हेमा मालिनी यांना शेतात काम करताना पाहून अनेक जण प्रभावित झाले. महत्त्त्वाचे म्हणजे हेमा हा उन्हात काम करताना दिसल्या. त्यांनी शेतकऱ्याची विचारपूस केली. हेमा यांना मथुरामधून भाजपची उमेदवारी मिळाली आहे.