PHOTOS

धर्मेंद्रसोबत नाही तर Hema Malini यांना दुसऱ्यासोबत करायचं होतं लग्न, लहानपणीच पडल्या होत्या प्रेमात; 'या' सुपरस्टारसोबत लग्न...

Hema Malini Birthday : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी या लहानपणीच प्रेमात पडल्या होत्या. त्यांना धर्मेंद्रसोबत लग्न करायच नव्हतं. हेमा मालिनी यांचं लग्न एका सुपरस्टारसोबतच जुळलं होतं. 

Advertisement
1/8

 हेमा माहिली यांच्या आज 75 वा वाढदिवस साजरा करत आहे. तुम्हाला माहिती आहे की, हेमा मालिनी यांनी ड्रीम गर्लचं टॅग कोणी दिलं ते. राज कपूर यांनी ड्रीम गर्ल हे नाव दिलं होतं. 

2/8

हेमा मालिनी यांनी वयाच्या 14 व्या वर्षी डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं.  1968 मधील सपनो का सौदागर चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर शोले, सीता गीत, नसीब, जॉनी, मेरा नाम, सत्ते पे सत्ता, त्रिशूल, क्रांती, प्रेम नगर यासारखे चित्रपट केले. 

3/8

अभिनेत्रीने राजेश खन्नासोबत 10 हिट चित्रपट दिले. तर धर्मेंद्रसोबत 35 चित्रपटांमध्ये काम केलं. या दोघांनी एकत्र पडद्यावरही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी लव्ह स्टोरी ही एका फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.

4/8

आधी मैत्री आणि नंतर त्यांचं प्रेम झालं. या नात्याला हेमा मालिनींच्या घरच्यांचा विरोध होता. कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होते. धर्मेंद्र आणि हेमा यांचं नातं तोडण्यासाठी अभिनेत्रीचे वडील शूटिंग सेटवर सोबत जात होते.

5/8

एवढंच काय हेमा मालिनीच्या कुटुंबाने त्यांचं लग्न अभिनेता जितेंद्र यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. पण धर्मेंद्र यांनी फिल्मी स्टाइलमध्ये येईन हे लग्न थांबवलं आणि दोघांनीही सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. 

6/8

10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 21 ऑगस्ट 1979 ला धर्म आणि नाव बदलून लग्न केलं. धर्मेंद्र यांनी वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यामुळे हेमासोबत लग्न करण्यासाठी त्यांना धर्म बदलावा लागला होता.

7/8

या लग्नाच्या प्रमाणपत्रावर लिहिलं आहे की, दिलावर खान केवल कृष्णा (44 वर्षे) याने आयेशा बीआर चक्रवर्ती (29 वर्षे) हिला दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत 1,11,000 रुपये हुंडा देऊन पत्नी म्हणून स्वीकारलंय.

8/8

पण धर्मेंद्रच्या आधीही हेमा मालिनी यांचं हृदय दुसऱ्यासाठी धडधडत होतं. त्या लहानपणीच त्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या. ते दुसरं कोणी नसून भगवान श्रीकृष्ण होते. अभिनत्रेने लहानपणीच एका मित्राला सांगितलं होतं मी कृष्णाशी लग्न करणार आहे. त्या रोज भगवान कृष्णाचे रोज चित्र विकत घेत होत्या आणि आपल्या खोलीत लावत होत्या.





Read More