PHOTOS

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मुळे रणवीर-आलियाला मालामाल; मानधनाचा आकडा पाहिला का?

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Ranveer Singh And Alia Bhatt Payment: रॉकी और रानी की प्रेम कहानी हा मल्टीस्टारर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे लीड रोलमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटासाठीच्या मानधनाचे आकडे समोर आले असून रणवीर आणि आलियाला किती पैसे देण्यात आलेत याची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात याचबद्दल...

Advertisement
1/9

आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची प्रमुख भूमिका साकारलेला  करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

2/9

28 जुलै रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट निर्माता म्हणून धर्मा प्रोडक्शन म्हणजेच करण जोहरसाठी खास असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील 25 वं वर्ष करण साजरं करणार आहे.

3/9

या चित्रपटामध्ये अनेक कलाकार आहेत. चित्रपटात रणवीर सिंहने रॉकी रंधावा या पंजाबी तरुणाची भूमिका साकारली आहे. रणवीरच या चित्रपटाच्या नावामधील रॉकी आहे. 

4/9

तर दुसरीकडे आलियाने राणी चॅटर्जी या बंगाली मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट म्हणजे लव्हस्टोरी असून ट्रेलरमधूनच त्याची झलक पहाया मिळाली आहे.

5/9

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यानंतर या चित्रपटासाठी कोणाला किती मानधन मिळालं आहे याची चर्चा सुरु झाली आहे.

6/9

चला तर मग जाणून घेऊयात या चित्रपटासाठी रॉकी आणि राणीला किती पैसे मिळालेत.

7/9

रणवीर सिंहला या चित्रपटासाठी तब्बल 25 कोटींचं मानधन धर्मा प्रोडक्शनने दिलं आहे. 'इंग्लीश जागरण'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

8/9

राणी चॅटर्जीची भूमिका साकारण्यासाठी आलिया भट्टला करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने तब्बल 10 कोटींचं मानधन दिलं आहे.

9/9

या चित्रपटामधील इतर भूमिका साकारणाऱ्या शबाना आझमी, जया बच्चन, धर्मेंद्र यांना प्रत्येकी 1 कोटींचं मानधन देण्यात आल्याचं वृत्त 'कोईमोई'ने दिलं आहे.





Read More