कमी किंमत, जास्त मायलेज आणि कमी देखभाल असणाऱ्या या बाईकसाठी भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त मागणी. जाणून घ्या सविस्तर
भारतीय बाजारपेठेत नेहमीच कमी किंमत आणि जास्त मायलेज तसेच कमी देखभाल असणाऱ्या बाईकला लोकांची पसंती आहे.
रोजच्या प्रवासासाठी अशीच एक बाईक आहे ज्यावर देशाचा पूर्ण विश्वास आहे. गेल्या अनेक दशकांपासून ही विश्वासार्हता या बाईकबद्दल लोकांमध्ये आहे.
कंपनी दर महिन्याला या बाईकच्या 2.5 लाखांहून अधिक गांड्याची विक्री करते. जिचे नाव हिरो स्प्लेंडर आहे. यंदाही या बाईकने नवा विक्रम केला आहे.
गेल्या 11 महिन्यांमध्ये या कंपनीने 33 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केलीय. हिरोच्या या सिरीजमध्ये अनेक मॉडेल्सचा समावेश आहे.
स्प्लेंडर प्लसची सुरुवातीची किंमत 75, 441 रुपये आहे. ही बाईक i3S, i3S Black, Accent आणि i3S Matte Axis Grey या चार प्रकारांमध्ये येते.
या बाईकमध्ये 97.2 सीसी इंजिन वापरले आहे. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाईकचे वजन सुमारे 112 किलो आहे.
कमी देखभाल आणि जास्त मायलेजसाठी हिरोच्या बाईक खूप प्रसिद्ध आहेत. या बाईक 1 लीटरमध्ये 70 किमीचा मायलेज देते.