हवामान खात्याने शनिवारपर्यंत हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
लाहौल आणि स्पितीमधील केलांग येथे ८.५ अंश सेल्सिअस तपामनाची नोंद झाली आहे. तर, कल्पा आणि केलांग या परिसरात ११ सेंटीमीटर हिमवृष्टी झाली आहे.
शिमलापासून २५० किमी दूर असलेल्या कल्पा येथे नीचांकी तापमान शून्य ते ३.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं.
राजधानी शिमलामध्ये नीचांकी तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. तर, कुफरीमध्ये तापमान ३.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी IANS ला सांगितले की, 'कुल्लू, किन्नोर, लाहौल, स्पिती, शिमला आणि चंबा या परिसरात हिमवृष्टी झाली.' शिमला आणि त्याच्या आसपास कुफरी, नारकंडामध्ये पाऊस झाला. मनालीमध्ये २० मिमीपर्यंत पाऊस पडला. मनालीपासून केवळ ५२ किमी दूर रोहतांगमध्येही हिमवृष्टी झाली.