Hindu Religion Pakistan Cricketers : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक गोष्टीचा बहिष्कार आणि विरोध केला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आता भारत आणि जगाच्या निशाण्यावर आहे. पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश असला तरी पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात खेळलेल्या हिंदू आणि नॉन मुस्लिम क्रिकेटर्स विषयी जाणून घेऊयात.
भारताचा शेजारी देश बांगलादेशमध्ये आतापर्यंत 10 हिंदू क्रिकेटर्सनी त्यांच्या देशाकडून आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांची छाप सोडली. तर पाकिस्तान क्रिकेटच्या 67 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन हिंदू क्रिकेटर्सनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाचं प्रतिनिधित्व केलं.
दानिश कनेरिया हा पाकिस्तानचा एक हिंदू क्रिकेटर आहे ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. कनेरिया हा माजी क्रिकेटर अनिल दलपत याच्या काकांचा मुलगा आहे. दानिश कनेरियाने अनेक वर्ष पाकिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळले. कनेरियाने डिसेंबर 2000 मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 61 टेस्टमध्ये 261 विकेट घेतल्या आहेत. तर 18 वनडे सामन्यात त्यांनी 15 विकेट घेतले.
कनेरियाने अनेकदा आपल्या मुलाखतींमधून सांगितलं की, हिंदी धर्मीय असल्याने पाकिस्तान क्रिकेट संघात खेळताना त्याला अनेकदा समस्यांचा सामना करावा लागला. दानिश कनेरिया बऱ्याचदा त्याच्या युट्युब चॅनलवरून पाकिस्तान विरुद्ध बोलताना दिसून येतो. पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा त्याने पाकिस्तानवर टीका केली होती.
अनिल दलपत पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू क्रिकेटर होते. मार्च 1984 मध्ये कराचीत इंग्लंड विरुद्ध त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अनिल दलपतने पाकिस्तानसाठी 9 टेस्टमध्ये 167 धावा आणि 15 वनडेमध्ये 87 धावा केल्या आहेत.
क्रिकेटर अनिल दलपतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर पाकिस्तान देश सुद्धा सोडला होता. ते सध्या कॅनडात राहत असून स्वतःच बिझनेस करतायत. अनेकदा त्यांनी मुलाखतींमधून सांगितलं की, हिंदू असल्याने पाकिस्तान संघात त्यांच्या सोबत भेदभाव व्हायचा म्हणून त्यांना आपला देश सोडावा लागला.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वालिस मथियास हे ख्रिस्तचन धर्मीय होते. वालिसने 1955 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी 21 टेस्टमध्ये 783 धावा केल्या होत्या.
हिंदू वगळता काही ख्रिस्तचन धर्मीय क्रिकेटर्स सुद्धा आहेत ज्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व केलं होतं. सोहैल फजल हे पाकिस्तानचे ख्रिस्तचन क्रिकेटर असून त्यांना त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा 17 ऑक्टोबर 1989 रोजी वेस्टइंडिज विरुद्ध खेळला होता. फजलने पाकिस्तानकडून केवळ 2 वनडे सामने खेळले यात त्याने 56 धावा केल्या.