PHOTOS

हीरामंडीतील 'शमा'चं खरं वय ओळखण खूपच कठीण! कितवी शिकलीय माहितीय का?

 प्रतिभा रंता कोण आहे? तिने बॉलिवूडमध्ये कशी एन्ट्री केली? ती कितवी शिकलीय? असे अनेक प्रश्न सर्च इंजिनमध्ये विचारले जात आहेत. 

Advertisement
1/12
हीरामंडीतील 'शमा'चं खरं वय ओळखण खूपच कठीण! कितवी शिकलीय माहितीय का?
हीरामंडीतील 'शमा'चं खरं वय ओळखण खूपच कठीण! कितवी शिकलीय माहितीय का?

Pratibha Ranta: किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

2/12

सर्वच नव्या चेहऱ्यांना संधी देणे ही या चित्रपटाची खासियत आहे. या सिनेमात प्रतिभा रंता, नितांशी गोयल आणि स्पर्श श्रीवास्तव असे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील.

3/12
एक नाव खूप चर्चेत
एक नाव खूप चर्चेत

सर्व कलाकारांनी दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक नाव खूप चर्चेत आहे आणि ते म्हणजे प्रतिभा रंता.

4/12
प्रतिभा रंता कोण आहे?
 प्रतिभा रंता कोण आहे?

प्रतिभा रंता या चित्रपटात जयाची भूमिका केली होती. तिने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. प्रतिभा रंता कोण आहे? तिने बॉलिवूडमध्ये कशी एन्ट्री केली? ती कितवी शिकलीय? असे अनेक प्रश्न सर्च इंजिनमध्ये विचारले जात आहेत. 

5/12
फिल्म मेकिंगमध्ये पदवी
फिल्म मेकिंगमध्ये पदवी

प्रतिभा रंताचे शालेय शिक्षण कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून झाले. तिने मुंबईच्या उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून फिल्म मेकिंगमध्ये पदवी घेतली आहे. 

6/12
अभिनय आणि मॉडेलिंग
अभिनय आणि मॉडेलिंग

प्रतिभाने शिमला येथे थिएटर आर्टिस्ट आणि प्रोफेशनल डान्सर म्हणूनही काम केले आहे आणि नंतर तिने अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. 

7/12
मिस मुंबई'चा खिताब
मिस मुंबई'चा खिताब

2018 मध्ये प्रतिभाने 'मिस मुंबई'चा खिताब जिंकला. त्यानंतर तिने झी टीव्हीच्या 'कुर्बान हुआ' या लोकप्रिय शोमध्ये काम केले आणि येथून तिला घराघरात ओळख मिळाली. 

8/12
हीरामंडीमध्ये शमाच्या भूमिकेत
हीरामंडीमध्ये शमाच्या भूमिकेत

यासोबतच 'आधा इश्क' नावाच्या डेली सोपमध्येही तिने काम केले. प्रतिभा रंताने किरण रावच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती हीरामंडीमध्ये शमाच्या भूमिकेत दिसली.

9/12
टीव्हीवरून मोठ्या पडद्याकडे
टीव्हीवरून मोठ्या पडद्याकडे

करिअरमध्ये ग्रोथ हवी म्हणून मी टीव्हीवरून मोठ्या पडद्याकडे वळली, असे ती सांगते. लापता लेडीजसाठी तिने स्वतः आमिर खानकडे ऑडिशन दिले होते. 

10/12
लापता लेडीज टीमचा एक भाग
लापता लेडीज टीमचा एक भाग

आमिर खानला तिचा अभिनय आवडला पण त्यावेळी प्रतिभाला कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिला गेला नव्हता. नंतर तिला आमिर खानच्या टीमकडून फोन आला आणि त्यामुळे ती लापता लेडीज टीमचा एक भाग बनली.

11/12
अभिनेत्री आणि मॉडेल
अभिनेत्री आणि मॉडेल

प्रतिभा रंता या पेशाने अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. ती हिमाचल प्रदेशातील शिमला येथील रहिवासी आहे. 

12/12
अवघ्या 24 वर्षांची
अवघ्या 24 वर्षांची

प्रतिभाचा जन्म 17 डिसेंबर 2000 मध्ये झाला. ती आता अवघ्या 24 वर्षांची आहे.





Read More