महाराष्ट्रात पुरणपोळीला अत्यंत महत्त्व आहे. पहिल्यांदाच पुरणपोळी बनवणाऱ्या महिलांना कधी कधी पोळी लाटताना खूप कष्ट पडतात. त्याचसाठी आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत.
पुरणपोळी ही जिभेवर ठेवताच विरघळायला हवी. त्यासाठी सारण तयार करण्यापासून ते कणिक मळण्यापर्यंत सर्व परफेक्ट लागतं. अन्यथा पोळी लाटताना फुटते. त्यासाठी ही परफेक्ट ट्रिक जाणून घ्या.
अनेकदा पुरण सैल किंवा पातळ झाल्यास पोळी फुटते. अशावेळी पुरण पातळ झाल्यास त्यात 1 चिमुटभर सोडा घाला. त्यामुळं पुरण पातळ होत नाही व पोळीदेखील लाटता येते.
पुरणपोळी करताना पुरण जास्त सुकलेले नसावं. थोडं मउसर असावे जेणेकरुन चटकन हाताने वळता येईल. पुरण जास्त सुकलेले असावे जेणेकरुन पोळी फाटण्याची शक्यता असते.
पुरण गरम असतानाच ते पुरण यंत्रातून फिरवून घ्या. कारण मिश्रण थंड झाल्यानंतर ते नीट वाटलं जात नाही. डाळ तशीच राहिल्यास मग पोळी लाटताना फाटते.
पुरणपोळीचे पीठ मळताना सैलसर मळावे. तसंच, भिजवलेले पीठ दोन तास ठेवून द्या.
पुरण करताना चण्याची डाळ 1 ते 2 तास आधी भिजवून ठेवावी. त्यामुळं डाळ छान मऊ शिजते. डाळ व्यवस्थित शिजली नाही तर डाळीला कडकपणा येतो.