पामेला अँडरसन एक कॅनेडियन अभिनेत्री तसेच मॉडेल, निर्माता, लेखक आहे. हॉलीवूड अभिनेत्री पामेला अँडरसन नेहमीच चर्चेत असते. पामेलाने आतापर्यंत सहाव्यांदा लग्न केले आहे.
सध्या 90 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री पामेला अँडरसन ही तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीकडून मिळालेल्या रकमेमुळे चर्चेत आहे. हॉलीवूड निर्माते असलेल्या जॉन पीटर्स यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात पामेलासाठी मोठी रक्कम मागे ठेवली आहे.
पामेला आणि जॉनचे लग्न केवळ 12 दिवस टिकले होते, पण आता त्यांच्या मृत्यूपत्रातून धक्कादायक तथ्य समोर आले आहे. मृत्यूपत्रानुसार पामेला अँडरसनला जवळपास 81 कोटी रुपये मिळणार आहेत.
जॉन आणि पामेला पहिल्यांदा 1980 मध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. दोघेही एकमेकांना डेट करू लागले. 20 जानेवारी 2020 रोजी जॉन आणि पामेला यांनी मालिबू येथे आयोजित एका खाजगी समारंभात एकमेकांशी लग्नगाठ बांधली.
पण विवाह प्रमाणपत्रासाठी कायदेशीर कागद पत्रांची पूर्तता पामेलाने केली नाही. दोघांमध्ये गोष्टी बिघडू लागल्या आणि 1 फेब्रुवारी 2020 रोजी हे जोडपे वेगळे झाले.