मलायका अरोरा नेहमीच आपल्या त्वचेची खास काळजी घेते. ती चेहऱ्यावरील मुरुमं आणि डाग दूर करण्यासाठी घरगुती उपायांवर विश्वास ठेवते. यासाठी त...
मुरुमं अचानक दिसू लागतात आणि त्यामुळे त्रास होतो. रात्री झोपताना स्वच्छ त्वचेसह झोपतो आणि सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर मुरुमं दिसली तर नाराजी वाटणं साहजिक आहे. अशा वेळी नखांनी मुरुमं खाजवणं किंवा फोडणं हा उपाय नाही. अशा परिस्थितीत मलायका अरोराचा घरगुती फेस पॅक अत्यंत उपयोगी ठरू शकतो.
मलायका तीन घटक वापरून फेस पॅक तयार करते. एक चमचा दालचिनी पावडर, एक चमचा मध आणि अर्धा लिंबाचा रस. हे पदार्थ एकत्र करून पेस्ट तयार करावी. पेस्ट जर फार जाडसर वाटत असेल तर त्यात अधिक मध घालू शकता. हा फेस पॅक चेहऱ्यावर 8 ते 10 मिनिटे ठेवून थंड पाण्याने धुवावा.
मलायका सांगते की, हा पॅक लावल्यानंतर चेहऱ्यावर थोडीशी जळजळ जाणवू शकते. पण जर त्वचेला जास्त त्रास जाणवला तर लगेच चेहरा धुवून टाकावा. हा पॅक डोळ्यांच्या किंवा तोंडाच्या भोवती लावू नये. फेस पॅक धुतल्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.
1. कडुलिंब आणि हळद पॅक: कडुलिंबाची पाने बारीक वाटून त्यात चिमूटभर हळद आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि धुवा. 2. मध आणि हळद पॅक: मध आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला अँटीबॅक्टेरियल गुण मिळतात.
3. ओट्स आणि दही पॅक: ओट्सचे पीठ आणि गरजेनुसार दही मिसळून चेहऱ्यावर 20 मिनिटे लावावे. हा पॅक त्वचा एक्सफोलिएट करतो. 4. चंदन आणि हळद पॅक: चंदन आणि हळद यामध्ये दूध किंवा गुलाबजल मिसळून 15 मिनिटे चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
5. मुलतानी माती आणि गुलाबजल पॅक: 2 चमचे मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार गुलाबजल मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर 15-20 मिनिटे ठेवून थंड पाण्याने धुवा. या प्रकारचे काही फेस पॅक लावून देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याची निगा राखू शकतात.