PHOTOS

विदर्भाची शान! 15 दिवस आरामात टिकणारी सांबारवडी, एकदा करून बघाच

विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सावजी रस्सा, सावजी मटण आणि पाटवड्या आणि संत्रा बर्फी हे पदार्थ डोळ्यांसमोर येतात. मात्र विदर्भ तेवढ्यापुरताच मर्यादित नाहीये. विदर्भातील आणखी एक स्पेशालिटी म्हणजे सांबारवडी. 

Advertisement
1/8
विदर्भाची शान! 15 दिवस आरामात टिकणारी सांबारवडी, एकदा करून बघाच
विदर्भाची शान! 15 दिवस आरामात टिकणारी सांबारवडी, एकदा करून बघाच

विदर्भातील अनेक पदार्थ पुण्या-मुंबईकडे मिळत नाहीत. ते विदर्भात जावूनच खावे लागतात. त्यामुळं विदर्भातील अनेक पदार्थांची माहिती खवय्यांना नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विदर्भ स्पेशल पदार्थाची माहिती देणार आहोत. 

2/8

विदर्भात कोथिंबीरीला सांबर म्हणतात. त्यामुळं सांबरवडी म्हणजे थोडक्यात कोथिंबीर वडी. मात्र सांबारवडी नेहमीच्या कोथिंबीरवडीपेक्षा फार वेगळी आहे. आज आपण पाहुयात या पदार्थाची रेसिपी

3/8
साहित्य
साहित्य

डाळीचे पीठ, कणिक, तांदळाचे पीठ, ओवा, जिरे, मीठ, तिखट आणि तेल

सारणासाठीचे साहित्य

3 जुड्या कोथिंबीर, 2 कांदे, दाण्याचा कूट, सुक्या खोबऱ्याचा किस, 1 चमचा खसखस, 1 चमचा धणे, लिंबाचा रस 

4/8
कृती
कृती

सर्वप्रथम बेसन म्हणजेच डाळीच्या पीठात ओवा, जिरे, मीठ, तिखट आणि कडल तेलाची मोहन घालून मग पीठ चांगले मळून घ्या. हे पीठ थोड्यावेळ भिजत ठेवा. 

 

5/8

एका कढाईत खोबरे चांगले भाजून घ्या. त्यानंतर धुवून कोरडी केलेली कोथिंबीरदेखील त्याच कढईत टाकून चांगली परतवून घ्या. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून ठेवा. 

6/8

 त्यानंतर कढाईत तेल घेऊन त्यात सगळे मसाल्यांची फोडणी द्या. त्यातच कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घाला. मिश्रण चांगले परतून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा. 

7/8

आता मळलेले कणिकेचा एक गोळा घ्या आणि छोटी चपाती लाटून घ्या. आता कढाईतील सारण त्यावर ठेवून दोन्ही बाजू मुडपून रोल करुन घ्यावा. आता कढाईत तेल गरम करुन वड्या तळून घ्या

8/8

सांबारवडी तुम्ही दह्यासोबत किंवा कढीसोबत खावू शकता. 





Read More