मारुती सुजुकीच्या नव्या डिझाईनला आव्हान देण्यासाठी होंडा आपली कॉम्पॅक्ट सेडान कार अमेज यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च करु शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवी होंडा अमेजमध्ये यावेळी खूप बदल पहाण्यास मिळणार आहेत.
नव्या अमेजमध्ये इंटेरियरमध्ये सध्याच्या मॉडलच्या तुलनेत खूप चांगलं मटेरियल वापरलं आहे. तसेच या गाडीचं डॅशबोर्डही आधीपेक्षा आकर्षक असणार आहे.
होंडाने नव्या गाडीत केबिन स्पेस वाढवला आहे त्यामुळे मारुती डिझायरला आपल्या सेगमेंटमध्ये आव्हान देता येईल. स्पेस जास्त असल्यामुळे नव्या होंडा अमेजच्या मागच्या सीटवर तीन-चार व्यक्ती आरामात बसू शकतात.
नवी होंडा अमेजमध्ये १.२ लीटर V-TEC पेट्रोल आणि १.५ लीटर D-TEC इंजिनचा पर्याय देण्यात येणार आहे. अमेजच्या एक्सटीरियरला होंडा सिटीप्रमाणे अपग्रेड करता येऊ शकतं. या गाडीत ऑटोमेटिक गियरबॉक्सही देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नव्या होंडा अमेजला मारुतीच्या नव्या डिझायर गाडीची टक्कर असणार आहे. नव्या डिझायरची किंमत ५.४५ लाख रुपयांपासून ९.४१ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरुम) आहे.
मारुतीच्या नव्या डिझायरमध्ये १.२ लीटर VVT पेट्रोल इंजिन ८२bhpची पावर आणि ११३Nm चं टॉर्क जनरेट करतं. ही कार पेट्रोल इंजिनसोबतच २२kmpl मायलेज देते. तर, १.३ DDiS १९० डिजल इंजिन ७३bhp पावर आणि १८९Nm टॉर्क जनरेट करते. डिझल इंजिनसोबत ही कार २८.४०km/१ मायलेज देते.