PHOTOS

दचकून उठता, तर 'हा' दातखिळी बसवणारा Horror Movie पाहू नका; OTT वरही धुमाकूळ

Best Supernatural Horror Film On OTT: एकिकडे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच एका दाक्षिणात्य चित्रपटानं त्याला चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे.  श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्या क्षणापासून दमदार कमाई करताना दिसला. आतापर्यंत या चित्रपटानं 876 कोटी रुपयांचा गल्लाही जमवला. 

 

Advertisement
1/7
भयपट
भयपट

भयपट... काहींच्या आवडीचे चित्रपट. थरार, गुढ रहस्य आणि हादरवणारा शेवट अशा काहीशा कथानकाला साद घालणाऱ्या या भयपटांच्या यादीत आता एका अशा चित्रपटाची एन्ट्री झाली आहे ज्यानं लोकप्रियतेचा विक्रमच मोडला आहे. 

 

2/7
वाढती लोकप्रियता
वाढती लोकप्रियता

मागील काही वर्षांमध्ये भयपटांची वाढती लोकप्रियता पाहता अनेक दिग्दर्शक आणि निर्माते अशाच धाटणीचे चित्रपट साकारताना दिसत आहेत. 2024 मध्ये असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि ओटीटीवर त्यानं धुमाकूळ घातला. 

3/7
ट्रेंड
ट्रेंड

पहिल्या स्थानावर ट्रेंड करणारा हा चित्रपट आहे  'डिमोंटे कॉलनी 2'. तामिळ कलाकार अरुलनिधी आणि प्रिया भवानी शंकर यांनी या चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या. 

 

4/7
कथानक
कथानक

कॅन्सर सर्वायवर सॅम रिचर्ड याच्या आत्महत्येच्या प्रकरणापासून या चित्रपटाची सुरूवात होते. अनेक हादरवणारे आणि धडकी भरवणारी दृश्य या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. 

5/7
अनपेक्षित वळणं
अनपेक्षित वळणं

अनेक अनपेक्षित वळणं असणाऱ्या या चित्रपटामध्ये  दमदार कथानक साकारण्यात आलं असून, 15 कोटी रुपयांच्या या चित्रपटानं 85 कोटी रुपयांची कमाई केली होती. 

6/7
रेटिंग
रेटिंग

IMDb नं या चित्रपटाला 10 पैकी 7 इतकी रेटींग दिली. एकंदरच प्रेक्षकपसंती आणि समीक्षक पसंती मिळालेल्या या चित्रपटातून नवं कथानक पाहायला मिळाल्यामुळं आता ओटीटीवरही तितकंच प्रेम मिळताना दिसत आहे. 

7/7
ओटीटी
ओटीटी

झी 5 वर हा चित्रपट प्रदर्शित होत असून, जरा जास्तच घाबरट स्वभावाच्या मंडळींनी तो न पाहिलेलाच बरा. 





Read More