पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम एकदा हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. यापूर्वी लीक झालेले खासगी फोटो, व्हिडिओ आणि कथित सेक्सिंग चॅट्स सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु असून, वाद पेटला आहे.
बाबर आझम हनी ट्रॅपला बळी पडला होता. त्याचे खासगी फोटो, व्हिडिओ आणि सेक्स्टिंग चॅट सोशल मीडियावर लीक झाले होते. या प्रकरणामुळे क्रिकेटपटूच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
लीक झालेले फोटो, व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि क्रिकेट चाहत्यांसह टीकाकारांचं लक्ष वेधून घेतलं. या पोस्टमध्ये कथित संवाद आणि फोटो, व्हिडीओ होते.
“eish.rajpoot1” या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो लीक झाले असल्याचा संशय आहे. पण यामागे नेमका हेतू काय होता हे स्पष्ट झालं नाही
बाबर आझमच्या चाहत्यांनी मात्र हे फोटो, व्हिडीओ मॉर्फ केल्याचा दावा केला आहे. याच्या तथ्यतेवरुनही चर्चा रंगली आहे.
बाबर आझमच्या नावे झालेला हा पहिलाच वाद नाही. हमिजा मुख्तार या महिलेने बाबर आझमवर छळ आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. या वादात आता ते आरोपही चर्चेत आहेत.
सर्वात धक्कादायक दावा म्हणजे, बाबर आझम सहकारी क्रिकेटरच्या मैत्रिणीशी कथितरित्या शारिरीक संबंध ठेवत होता. या बदल्यात तिच्या बॉयफ्रेंडच्या कारकीर्दीवर प्रभाव टाकण्याचं आश्वासन त्याने दिलं होतं.
वादाच्या दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) बाबर आझमला कसोटी कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे.
चाहत्यांचे मात्र यासंदर्भात दुमत आहे. अनेकांनी बाबर आझमची बाजू घेतली आहे. तर काहींनी त्याच्या प्रामाणिकणावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे.
सोशल मीडियावर सतत हॅशटॅग वापरण्यात येत असल्याने हा स्कँडल नेहमी चर्चेत असतो. तसंच यामुळे बाबर आझमसंबंधी ऑनलाइन सर्चही वाढला आहे.
पीसीबीने परिस्थिती हाताळण्यावर बारकाईने लक्ष ठेवलं आहे. बोर्ड या आरोपांना कसं हाताळतं यावर बाबर आझम आणि संघाचं भविष्य अवलंबून आहे.