PHOTOS

पत्र पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर का केला जायचा? आपल्या पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाचाच

Advertisement
1/8
पत्र पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर का केला जायचा? आपल्या पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाचाच
पत्र पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर का केला जायचा? आपल्या पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाचाच

पूर्वीच्या काळी कबूतरांमार्फत पत्र पाठवलं जायचं. हे तुम्ही ऐकलं असेलच. पण पत्र पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर कसा केला जायचा, हे जाणून घेऊयात. 

2/8

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवण्यासाठी पूर्वी कबुतरांचा वापर व्हायचा. अनेक गाण्यांमध्येही तुम्ही हे एकलं असेलच. पण यामागचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊयात. 

3/8

कबुतरांमध्ये एक विशेष गुण असून हा अत्यंत हुशार पक्षी मानला जातो. कबुतरांमध्ये मार्ग चांगल्या प्रकारे ओळखण्याची व मार्ग लक्षात ठेवण्याची क्षमता आहे. 

4/8

कबूतर स्वतःचा मार्ग स्वतः शोधतो आणि पात्र पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडतो. शतकानुशतके संदेश पोहोचवण्यासाठी हीच पद्धत वापरली जायची. 

5/8

प्रसिद्ध रोम सैनिक ज्युलियस सीझर यांनी कबुतरांचा उल्लेख पहिल्यांदा केला होता. ज्युलियस सीझरने कबूतरांद्वारे रोमला गॉलच्या विजयाची बातमी पाठवली असं सांगितलं जातं.

6/8

संशोधकांना कबुतराच्या मेंदूमध्ये 53 पेशींचा एक समूह आढळला. हा पेशांचा समूह कबूतरांना दिशा ओळखण्यात आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ठरवण्यात मदत करतो. 

7/8

कबुतरांमध्ये असलेला हा पेशींचा समूह जीपीएस यंत्रणेप्रमाणे काम करतो. या समुहातील प्रत्येक पेशी विविध दिशा ओळखू शकते, असं एका अहवालात नोंद आहे. 

8/8

पूर्वीच्या काळी कबुतरांना प्रशिक्षण देऊन युद्धासाठी व गुप्त संदेश पाठवण्यासाठी त्यांचा वापर केला जायचा.





Read More