Female Naga Sadhu : जी लोक दैनंदिन जीवनाचा त्याग करुन अध्यात्माच्या वाट धरतात त्यांना साधू किंवा साध्वी म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यात्माकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा प्रवास हा खूप खडतड असतो. त्यात महिला नागा साधूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता कायम दिसून येते.
नागा साधू आणि महिला नागा साधू यांचं रहस्यमयी दुनियेतील सत्य जगासमोर आल्यानंतर अनेकांची भुवया उंचावल्यात. देशाच्या कानाकोपऱ्यात 4 पीठे असून मग त्यांनी आखाडे तयार केले आणि नागा साधू देखील त्यांचा एक भाग करण्यात आलाय.
महिला नागा साधूंच जीनव अत्यंत रहस्यमय आणि कठीण असतं. त्यांना साधू होण्यासाठी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या आणि ब्रह्यचर्यच पालन करावं लागतं.
पुरुष साधू आणि महिला नागा साधू यांचं आयुष्य आणि नियम यात खूप फरक असतो. महिला नागा साधू सामान्य जगापासून दूर जंगलात, गुहा, पर्वतांमध्ये वास करतात. तिछे त्या देवाची पूजा, आराधना, जप करण्यात स्वत: ला मग्न करतात. फक्त कुंभमेळा असल्यावर त्या जगासमोर येतात.
महिला नागा साधू पुरुषांप्रमाणे विवस्त्र नसतात. त्या कायम केशरी किंवा करड्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. मीडिया रिपोर्टनुसार एकच महिला साधूला विवस्त्र राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण ती तिच्या गुंफामधून बाहेर येत नाहीत.
महिलांच्या वस्त्रांना गंती असं म्हटलं जातं आणि त्यांना एकच वस्त्र घालण्याची अनुमती असते. त्या टिळा लावून जटादेखील धारण करु शकतात.
6 ते 12 वर्षे कठोर ब्रह्मचर्याचं पालन केल्यानंतर त्यांना नागा साध्वी होण्याची अनुमती देण्यात येते.
दीक्षा घेण्यापूर्वी या महिला साध्वींना केशवपन करावं लागतं. एवढंच नाही तर साध्वींना हयात असतानाच स्वत:चं पिंडदान करावं लागतं. तेव्हा जाऊन त्या नागा साध्वी बनतात.