PHOTOS

तुमचे आवडते युट्यूबर्स किती शिकले आहेत? पाहा आशिष चंचलानी ते कॅरी मिनाटी पर्यंत कोण आहे सर्वाधिक शिक्षित

Famous Youtuber's Education: लहानपणापासून आपण ज्या युट्यूबर्सचे व्हिडीओ पाहतो आणि त्यांना प्रेम देतो. त्यांच्या शिक्षणाबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? काही युट्यूबर्स अभ्यासात हुशार तर काहींनी शिक्षण पूर्ण होण्याआधीच आपले करिअर सुरू केले. मात्र, प्रत्येकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

Advertisement
1/7
कॅरी मिनाटी:
कॅरी मिनाटी:

देशातील लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी म्हणजेच अजय नागरने डीपीएस फरिदाबाद येथून शिक्षण घेतले आहे. त्याने 12वीचे शिक्षण मधेच सोडले होते. मात्र, काही काळानंतर 12वी पूर्ण केली.

2/7
भुवन बाम:
भुवन बाम:

'बीबी की वाइन्स' यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या भुवन बामने दिल्ली विद्यापीठातून (DU) इतिहास विषयात पदवी मिळवली आहे. भुवन बाम हा देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्यूबर्सपैकी एक आहे.

3/7
प्राजक्ता कोळी:
प्राजक्ता कोळी:

'मोस्टलीसेन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता कोळीने मुंबई विद्यापीठातून मास मीडियाचा अभ्यास केला आहे. तिच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी ती विशेष प्रसिद्ध आहे. प्राजक्ताने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्येही आपले स्थान प्राप्त केले आहे.

4/7
आशिष चंचलानी:
आशिष चंचलानी:

आशिष चंचलानी त्याच्या विनोदी व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. त्याने बी.टेक केले आहे आणि मुंबईतील बॅरी जॉन अ‍ॅक्टिंग स्टुडिओमधून अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले आहे.

 

5/7
कुशा कपिला:
कुशा कपिला:

कुशा कपिला ही तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मधून पदवी घेतली आहे आणि युट्यूबवरून सुरुवात करून आता चित्रपटसृष्टीतही आपले स्थान निर्माण केले आहे.

6/7
तन्मय भट:
तन्मय भट:

तन्मय भट देशातील आघाडीच्या विनोदी कलाकारांपैकी एक आहे. त्याचे स्वतःचे युट्यूब चॅनल आहे. ज्याचे 3.56 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. त्याने मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजमधून अ‍ॅडव्हरटाईजमेंटची बॅचलर डिग्री घेतली आहे.

7/7
समय रैना:
समय रैना:

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर चर्चेत आलेला समय रैनाने हैदराबादमधून शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्यातील पीव्हीजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून प्रिंटिंग इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे.





Read More