Operation Sindoor Scalp Missile Attack on Pakistan: पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडणाऱ्या या हल्ल्यात स्काल्प मिसाईलचा मारा करण्यात आला. याच मिसाईलसंदर्भात महत्त्वाची माहिती.
Operation Sindoor : भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर हा हल्ला नेमका कसा झाला इथपासून त्या हल्ल्यासाठी नेमका कोणत्या शस्त्रास्त्रांचा वापर झाला याचीही माहिती समोर आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या स्काल्प मिसाईलनं महत्त्वाची भूमिका बजावली त्या स्काल्प मिसाईलची वैशिष्ट्ये पाहूयात..
कसं आहे भारताचं स्काल्प मिसाईल? या मिसाईलला स्टॉर्म शॅडो आणि स्काल्प अशा नावांनी ओळखलं जातं. हे मिसाईल एमबीडीए या फ्रान्स आणि ब्रिटनच्या संरक्षण कंपनीनं तयार केलं आहे.
हवेतून जमिनीवरील लक्ष्यांवर प्रहार करण्यासाठी तयार करण्यात आलेलं मिसाईल. लांबच्या अंतरावरूनही करता येतो लक्ष्यभेद.
अत्यंत अचूकपणे लक्ष्यभेद करण्यासाठी ओळखलं जातं हे क्षेपणास्त्र. ज्यामुळं वाढते भारतीय हवाई दलाची क्षमता.
हवेतून जमिनीवर हल्ला करण्याची उत्तम क्षमता या क्षेपणास्त्रात असून, शत्रूनं व्यापलेल्या भूभागावर दुरवरून हल्ला करणंही सहज शक्य.
दूरवरच्या अंतरावरून मारा करण्याची क्षमात असणाऱ्या या क्षेपणास्त्राचं वजन आहे 1300 किलोग्राम आणि लांबी आहे 5.1 मीटर.
पाकिस्तानवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा वेग सबसोनिक अर्थात आवाजाच्या वेगाहून थोडा कमी आहे.
पाकिस्तानच्या एचक्यू 9 रडारलासुद्धा हे क्षेपणास्त्र हेरता आलं नाही आणि तिथं या देशाचा मोठा घात झाला.
भारतानं दिलेलं उत्तर पाहता आता पाकिस्तान त्यामुळं बिथरला असून सातत्यानं चिथावणीखोर वक्तव्य करत आहे.
इतकंच नव्हे, तर सीमाभागात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचं धाडस पाकिस्तान करत असून त्याचं उत्तरही भारताकडून देण्यात येत आहे.