मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? याची माहिती घेऊया.
Maharashtra Din:१ मे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा दिवस आहे. यादिवशी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली.
1 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन भारतीय राज्ये त्यांचा स्थापना दिवस साजरा करतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, दोन्ही राज्ये मुंबई प्रदेशाचा भाग होती.
1 मे रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी आणि गुजराती भाषिक लोक स्वत:साठी वेगळ्या राज्यांची मागणी करत होते.
सोबतच मुंबई शहरदेखील गुजरातचा भाग असा, असा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी केंद्रामध्ये हालचालीही सुरू होत्या.
राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत अनेक राज्यांची निर्मिती झाली. या कायद्यानुसार कन्नड भाषिक लोकांसाठी कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली, तर तेलुगू भाषिकांना आंध्र प्रदेश मिळाला.
मल्याळम आणि तमिळ भाषिकांसाठी केरळ आणि तामिळनाडूची निर्मिती झाली. असे असताना मराठी आणि गुजरातींसाठी वेगळे राज्य मिळाले नव्हते. याबाबत अनेक आंदोलने झाली.
1 मे 1960 रोजी भारताच्या तत्कालीन नेहरू सरकारने मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत मुंबई प्रदेशचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यात येत होते. मुंबईबाबतही दोन राज्यांमध्ये वाद होता.
इथले बहुसंख्य लोक मराठी बोलतात म्हणून आम्हाला मुंबईसह महाराष्ट्र हवा यावर महाराष्ट्रातील जनता ठाम होती. गुजराती लोक मुंबई आपली आहे असे मानत होते. खूप मोठ्या संघर्षानंतर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली.