PHOTOS

दिवसातून किती तास झोपतात 'हे' बॉलिवूड स्टार्स? कुणी 8 तास, तर कुणी...

ts: बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फिटनेस आणि डाएटबद्दल किती जागरूक आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या झोपेच्या सवयी मात्र एकमेकांपेक...

Advertisement
1/9
हृतिक रोशन
हृतिक रोशन

हृतिक दररोज रात्री 9 वाजता झोपतो आणि सकाळी 5 वाजता उठतो. 8 तासांची झोप घेतल्याने त्वचा, शरीर आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. त्याचा ट्रेनर म्हणतो की हृतिक कधीही झोपेच्या बाबतीत हलगर्जीपणा करत नाही.

 

2/9
अक्षय कुमार
अक्षय कुमार

अक्षयची दिनचर्या ही 'अर्ली टू बेड, अर्ली टू राईज' अशीच आहे. तो दररोज 7–8 तास झोपतो. सकाळी 4.30 किंवा 5 वाजता उठून वर्कआउट करतो आणि रात्री 9–9.30 पर्यंत झोपायला जातो. यामुळे त्याची ऊर्जा कायम राहते.

3/9
आलिया भट्ट
आलिया भट्ट

आलिया खूप झोपाळू असल्याचं ती स्वत: सांगते. शूटिंग नसल्यास ती 18–18 तासही झोपू शकते. मात्र नियमित दिनक्रमात ती 7–8 तासांची झोप घेते.

 

4/9
शाहरुख खान
शाहरुख खान

शाहरुख दिवसाला फक्त 3–4 तास झोपतो. त्याच्या म्हणण्यानुसार, तो सतत नवीन कल्पनांवर काम करत असतो आणि त्याला झोप ही वेळेची नासाडी वाटते. त्यामुळेच त्याचं काम आणि झोप यांचं वेळापत्रक वेगळंच आहे.

5/9
सलमान खान
सलमान खान

सलमान फक्त 2.5 तास झोपतो. तो जास्त वेळ वर्कआउट, शूटिंग आणि ब्रँड प्रमोशन्समध्ये घालवतो. झोप कमी असली तरी त्याचा एनर्जी लेव्हल नेहमीच हाय असते.

 

6/9
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण

दीपिका दररोज 8 तास झोप घेण्यावर भर देते. तिच्या म्हणण्यानुसार, झोप ही तिच्या मेंटल हेल्थसाठी अत्यावश्यक आहे. शूटिंगमुळे वेळ बदलत असला तरी ती झोप पूर्ण करतच कामाला लागते.

7/9
रणवीर सिंग
रणवीर सिंग

रणवीर सिंग अत्यंत अ‍ॅक्टिव्ह आणि एनर्जेटिक अभिनेता आहे. तो 6 ते 7 तास झोप घेतो. त्याच्या एनर्जीचं रहस्य म्हणजे योग्य आहार, झोप आणि नियमित व्यायाम.

 

8/9
प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रा

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या प्रियंका चोप्राला वेळेचं फार व्यवस्थापन करावं लागतं. तरीही ती दररोज 6 ते 7 तास झोप घेण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते, झोप ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.

9/9
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

बिग बी अजूनही अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगतात. ते रात्री उशिरा झोपतात आणि पहाटे 5 वाजता उठतात. झोपेचा कालावधी 4–5 तासांचा असतो. पण तरीही त्यांची ऊर्जा वयाच्या मानाने खूप जास्त आहे.





Read More