PHOTOS

घटस्फोटानंतर सायना नेहवालला किती पोटगी मिळणार? Parupalli Kashyap ची संपत्ती किती?

Parupalli Kashyap Net Worth : 7 वर्षांच्या संसारानंतर सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप हे घटस्फोट घेणार आहेत, अशी पोस्ट खुद्द सायनाने तिच्या इन्स्टाग्रामवर टाकली. त्यानंतर सायनाला घटस्फोटानंतर किती पोटगी मिळणार यावर चर्चा सुरु झाली आहे. अशातच बॅडमिंटनपटू असलेला पारुपल्लीकडे किती संपत्ती आहे, पाहूयात. 

Advertisement
1/9

सायना आणि पारुपल्लीची दोघांची पहिली भेट ही गोपाचंद अकादमध्ये 2004 मध्ये झाली. प्रशिक्षणादरम्यान या दोघांची प्रेम कहाणी रंगली. त्यानंतर 2007 मध्ये दोघांनीही त्याचं नातं लोकांसमोर कबूल केलं. 

2/9

बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 14 डिसेंबर 2018 मध्ये दोघांनी लग्न केलं. या काळात सायना आणि पारुपल्ली एकमेकांना खूप पाठिंबा देताना दिसले. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीत खूप उंची गाठली. 

3/9

2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकून सायनाने भारताला अभिमानाने उंचीवर नेलं. त्यानंतर पारुपल्लीने त्यावर्षी पुरुषांच्या क्वार्टर फायनलमध्येही स्थान मिळवलं. 

4/9

पारुपल्ली आणि सायना यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर पोटगीची चर्चा सुरु झाली आहे. सायना आणि पारुपल्ली यांची संपत्ती किती आहे, हे गुगलवर सर्च केलं जातंय. 

5/9

तर मिळालेल्या माहितीनुसार संपत्तीबाबत सायना कश्यपपेक्षा खूप पुढे आहे. रिपोर्टनुसार 2025 पर्यंत तिची एकूण संपत्ती ही  36 कोटींच्या घरात आहे. सायनाची वार्षिक कमाई ही 5 कोटींपर्यंत आहे. 

 

6/9

 तिच्या कमाईचा मोठा भाग प्रायोजकत्वातून येतो आणि तिच्याकडे मर्सिडीज बेंझ बीएमडब्ल्यू आणि मिनी कूपर सारख्या लक्झरी कार देखील आहेत. याशिवाय, तिचे हैदराबादमध्ये एक सुंदर घर देखील आहे.

7/9

पारुपल्ली यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, 2025 मधील अहवालांनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 15 कोटी म्हणजेच 2 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.

 

8/9

ज्यामध्ये त्यांच्या कमाईचा मोठा भाग BWF स्पर्धा, कोचिंग क्लासेस, YONEX ब्रँड प्रायोजकत्वातून येतो. याशिवाय, ते हर्बल लाईफ ब्रँड प्रायोजकत्वातूनही चांगले पैसे कमवतात. 

9/9

जर आपण त्यांच्या मालमत्तेबद्दल बोललो तर त्यांच्याकडे हैदराबादमध्ये एक आलिशान फ्लॅट देखील आहे आणि गाड्यांमध्ये, त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ सारखी आलिशान कार आहे.





Read More