PHOTOS

शोएबने पहिल्या पत्नीला घटस्फोटानंतर दिले 15 कोटी, सानिया मिर्झाला किती मिळणार पोटगी?

शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियासोबत त्याचा घटस्फोट 2022 मध्येच झालाय असे म्हटले जात आहे.

Advertisement
1/9
शोएबने पहिल्या पत्नीला घटस्फोटानंतर दिले 15 कोटी, सानिया मिर्झाला किती मिळणार पोटगी?
शोएबने पहिल्या पत्नीला घटस्फोटानंतर दिले 15 कोटी, सानिया मिर्झाला किती मिळणार पोटगी?

Sania Mirza Alimony Ammount: माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. हे दोघे आता विभक्त झाले असून शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले आहे. 

2/9
किती पोटगी?
किती पोटगी?

शोएबने सनासोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान शोएबपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाला किती रक्कम पोटगी म्हणून मिळेल? याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. 

3/9
घटस्फोट 2022 मध्येच
 घटस्फोट 2022 मध्येच

2022 सालापासून शोएब आणि सानिया यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांकडून सोशल मीडियावर तशा हिंट मिळत होत्या. पण स्पष्टपणे कोणी काही सांगत नव्हते. शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियासोबत त्याचा घटस्फोट 2022 मध्येच झालाय असे म्हटले जात आहे.

4/9
घटस्फोट न घेता लग्न
घटस्फोट न घेता लग्न

2010 मध्ये शोएब मलिकने सानिया मिर्झाशी लग्न केले तेव्हा खूप वाद झाला होता. माझ्याशी घटस्फोट न घेता शोएब सानियाशी लग्न करत असल्याची टीका त्यावेळी पहिली पत्नी आयशा सिद्दीकीने केला.

5/9
2002 साली लग्न
 2002 साली लग्न

आयेशा आणि शोएबचे 2002 साली लग्न झाले होते. तिने शोएबविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसेच पुरावा म्हणून लग्नाची व्हिडिओ क्लिपही शेअर केली होती.

6/9
15 कोटी रुपयांची पोटगी
15 कोटी रुपयांची पोटगी

अयाशला फक्त शोएबला घटस्फोट घ्यायचा होता, असे आधी समोर आले होते. पण तिने शोएबकडून 15 कोटी रुपये पोटगीही घेतल्याचे नंतर समोर आले होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये शोएबने सुरुवातीला आयशासोबत लग्नाचे वृत्त फेटाळले पण सानियासोबत लग्नाच्या काही दिवस आधी त्याने एप्रिल 2010 मध्ये पहिली पत्नी आयशा सिद्दीकीला घटस्फोट दिला.

7/9
सानियाला किती पोटगी मिळेल?
सानियाला किती पोटगी मिळेल?

शोएब मलिक हा पाकिस्तानचा मोठा क्रिकेटर आहे. राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदासोबतच तो देश-विदेशातील विविध छोट्या-मोठ्या लीगमध्ये खेळताना दिसला आहे. 

8/9
230 कोटींचा मालक
230 कोटींचा मालक

याच कारणामुळे शोएब मलिकची गणना पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. रिपोर्टनुसार शोएब मलिकची एकूण संपत्ती 28 मिलियन डॉलर आहे. म्हणजेच तो 230 कोटींचा मालक आहे.

9/9
अधिकृत माहिती
अधिकृत माहिती

सानिया मिर्झा ही टेनिस स्टारही राहिली असून ती क्रीडा विश्वातील व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे शोएबच्या पहिल्या पत्नीपेक्षा सानिया मिर्झाला जास्त पोटगी मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम नेमकी किती असेल? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. 





Read More