PHOTOS

F1 कारचं मायलेज किती? एका रेसला किती लीटर इंधन लागतं? खर्चाचा आकडा पाहून डोळे पडतील पांढरे

तुम्हीसुद्धा कधी ना कधी एफवन कार चालवण्याचं स्वप्न पाहिलं असेल. अत्यंत सुंदर दिसणाऱ्या या कार किती मायलेज देतात तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊयात रंजक माहिती...

Advertisement
1/10

F1 Racing Car Millage And Fuel Price: एफवन कार किती इंधन वापरते? तिचं मायलेज काय? एका रेससाठी किती इंधन लागतं? असे प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडले असतील तर एकदा हे वाचाच. 

2/10

आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी हौसेपोटी एफ-वन रेस टीव्हीवर अथवा युट्यूबवर, सोशल मीडियावर किंवा अगदी गेममधील तरी पाहिली असेल. (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)

 

3/10

एफ-वन रेसमधील गाड्या सर्वाचेच लक्ष वेधून घेतात. या गाड्या प्रचंड महागड्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या असतात.  (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)

 

4/10

मात्र एफ-वन सर्किटमध्ये धावणाऱ्या कार किती मायलेज देतात हे तुम्हाला माहितीये का? एका रेससाठी त्यांना किती पेट्रोल लागतं याची तुम्हाला कल्पना आहे का? (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)

 

5/10

एफ-वनची एक पूर्ण रेस ही 305 किलोमीटर लांबीची असते. या गाड्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ई10 इंधन वापरलं जातं. यात 10 टक्के इथेनॉल असतं. (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)

 

6/10

तर या एफ-वन कार्स 45 लीटर पेट्रोलमध्ये 100 किलोमीटर अंतर कापतात. म्हणजेच या गाड्यांचं मायलेज एका लीटरला दोन किलोमीटरच्या आसपास आहे. (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)

 

7/10

एका लीटरमध्ये साधारणपणे दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापणाऱ्या गाड्यांमध्ये एका रेस दरम्यान अनेकदा इंधन भरावं लागतं. (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)

 

8/10

एकदाच पेट्रोल भरुन रेस पूर्ण करणं शक्य नसतं त्यामुळेच एफवन रेसदरम्यान गाड्यांना वेळोवेळी ब्रेक घ्यावा लागतो. याच वेळी कारची डागडुजीही अत्यंत वेगाने केली जाते. (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)

9/10

305 किलोमीटरची शर्यत पूर्ण करण्यासाठी एफ-वन कार्स 135 लीटर इंधन जाळतात. (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)

 

10/10

एफवन कारमधील इंधन आणि साध्या कारमध्ये वापरलं जाणारं इंधन नक्कीच वेगळं असतं. मात्र आपण एफवनमध्ये साधं इंधन वापरतात असं काही काळाकरता गृहित धरलं अन् भारतीय चलनानुसार इंधानाचा हिशोब केला तर 103 रुपये लीटरच्या हिशोबाने एका 305 किलोमीटरसाठी 13 हजार 905 रुपयांचं इंधन खर्च होतं. (सर्व फोटो फेसबुकच्या एफवन पेजवरुन साभार)





Read More