Mohammed Siraj: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत ( IND vs ENG) सामना जिंकणाऱ्या कामगिरीनंतर बीसीसीआयकडून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मिळालेल्या मोठ्या बक्षीसाबद्दल जाणून घ्या.
BCCI gives extra money to Mohammed Siraj: इंग्लंडविरुद्ध झालेल्या चुरशीच्या टेस्ट मालिकेत भारताच्या विजयात ज्या काही खेळाडूंनी निर्णायक भूमिका बजावली, त्यात मोहम्मद सिराजचं नाव अग्रेसर आहे.
केवळ मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणूनच नव्हे, तर आपल्या खेळातून टीम इंडियामधील आपली भूमिका अधिक ठोसपणे अधोरेखित करण्यात सिराज यशस्वी ठरला आहे.
ओव्हलमध्ये पार पडलेल्या निर्णायक कसोटीत, मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात घेतलेल्या 5 विकेट्स आणि एकूण 9 बळींनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला.
5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराज सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्याने मालिकेत 23 बळी घेतले. त्याच्या या चमकदार कामगिरीचं बीसीसीआयनेही विशेष कौतुक करत, त्याला अतिरिक्त बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.
मोहम्मद सिराजला 5 कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयकडून 75 लाख रुपये मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट बोर्ड एका कसोटी सामन्यात प्लेइंग 11 च्या प्रत्येक सदस्याला 15 लाख रुपये वेतन देते.
इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीनंतर मोहम्मद सिराजला बीसीसीआयकडून 5 लाख रुपयांचे अतिरिक्त बक्षीस मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय गोलंदाजाने घेतलेल्या प्रत्येक पाच विकेट्ससाठी 5 लाख रुपये अतिरिक्त देते.
या संपूर्ण मालिकेत जसप्रीत बुमराह वेळोवेळी बाहेर असतानाही, मोहम्मद सिराजने जबरदस्त सातत्य दाखवले. त्याने 185.3 ओव्हर्स टाकून तब्बल 23 विकेट्स घेतल्या. यामध्ये दोनवेळा एका डावात 5 विकेट्स आणि एकवेळा 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला.
सिराजची ही कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर ती भारतीय वेगवान माऱ्याचा आत्मविश्वास आणि भविष्य घडवण्याची तयारी दर्शवते. आता त्याला मिळणारं हे विशेष बक्षीस त्याच्या मेहनतीचं योग्य चीज मानलं जात आहे.