PHOTOS

बीसीसीआयने मागील वर्षी किती कर भरला? आकडा एवढा की एखादा देश चालेल!

BCCI Tax Pay In FY 2021-22: बीसीसीआयला दरवर्षी किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
1/6

आयसीसीच्या वार्षिक महसुलातून भारतीय बोर्डाला सर्वात मोठा हिस्सा मिळत आहे. गेल्या तीन वर्षीत, BCCI तब्बल 230 दशलक्ष डॉलर कमावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 

2/6

बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात भारत सरकारला कर भरावा लागतो. बीसीसीआय क्रिकेटची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था असल्याने बीसीसीआयला नेमका किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.

3/6
लेखी उत्तरात माहिती
 लेखी उत्तरात माहिती

बीसीसीआयने 2021-22 या आर्थिक वर्षात 1,159 कोटी रुपये आयकर भरल्याचं उघड झालं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी गेल्या पाच वर्षांतील उत्पन्न आणि खर्च यांचा तपशील दिला

4/6
आयकर रिटर्न
आयकर रिटर्न

बीसीसीआयने भरलेला आयकर आणि भरलेल्या रिटर्नच्या आधारे त्यांनी माहिती सांगितली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात, बीसीसीआयने 844.92 कोटी रुपये आयकर भरला होता.

5/6
महसूल माहिती
 महसूल माहिती

मागील 2021-22 आर्थिक वर्षात बीसीसीआयला 7,606 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती समोर आली आहे, तर त्याचा खर्च 3,064 कोटी रुपयांच्या जवळपास होता. असंही पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीतून समजतंय.

6/6
आयपीएल
आयपीएल

दरम्यान,आयसीसीच्या महसुलातून मिळणारी कमाई हा बीसीसीआयचा एक उत्तम स्रोत आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग मानली जाते. येत्या काही वर्षांत बीसीसीआय आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.





Read More